घरातून गायब अल्पवयीन मुलगी सापडली बडनेरात; पळवून नेणाऱ्याचा शोध सुरू 

kidnaping case
kidnaping case

जळगाव : शहरातील खंडेरावनगरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले होते. सदर घटना ८ एप्रिलला समोर आली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल होता. रामानंदनगर पोलिसांनी मुलीला अवघ्या काही दिवसातच शोध लावला असून तिला अमरावती जिल्‍ह्‍यातील बडनेरा येथून सुखरुप ताब्यात घेतले आहे. मुलीला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. 

खंडेराव नगरातील आशाबाबा कॉलनीत १७ वर्षीय मुलगी आई- वडीलांसह राहते. वडील मोलमजूरी करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. ८ एप्रिलला अल्पवयीन मुलगी घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. दरम्यान परिसर आणि नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता अल्पवयीन मुलगीचा शोध लागला नाही. याप्रकरणी अल्पवयीन मुलीची आई यांनी रामानंदनगर पोलीसात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुलगी सापडली पण..
स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी नरेंद्र वारुळे व संदीप साळवे यांच्याकडून मिळालेल्या तांत्रिक मदतीच्या आधारे अल्पवयीन मुलगी ही अमरावतील जिल्हयातील बडनेरा येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक बिरारी, पोलीस नाईक महेंद्र पाटील, पोलीस कॉन्स्टेबल भुषण पाटील यांच्या पथकाने बडनेरातून अल्पवयीन मुलीला सुखरुप ताब्यात घेतले. संबंधित मुलीला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. मुलीला पळविणाऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पुढील तपास सहाय्यक पेालिस निरीक्षक दिपक बिरारी हे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com