चोरट्या मार्गाने कापड विक्री; भुसावळातील दोन मॉलवर कारवाई 

shop seal
shop seal

भुसावळ (जळगाव) : राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले असून, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील भुसावळ शहरातील काही दुकानदार आपली दुकाने सुरू ठेवून शासनाच्या नियमांची पायमल्ली करीत असल्याने प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. सोमवारी (ता. १२) गांधी चौक भागात दोन मॉल सुरू असल्याने पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करीत त्यांच्याकडून दंड वसूल केला. 
जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे राज्यात आठवडाभरापासून मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शनिवार, रविवारी विकेंड लॉकडाऊन झाला. त्यात नागरिकांनी चांगला पाठिंबा दिला. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरातील मनिष मॉल आणि जनता टॉवर या दुकानदारांनी दुकानांची ग्राहकांना दुकानात घेऊन शटर लावलेले होते.

पाच हजाराचा दंड
दुकानात खरेदी सुरू असल्याच्या माहितीच्या आधारे पालिका व पोलिस प्रशासनाने या दुकानांची तपासणी केली असता दुकाने सुरू असल्याचे आढळून आल्यामुळे दोन्ही आस्थापनांना प्रत्येकी ५-५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई आयपीएस आर्चित चांडक, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठच दीपक पाटील, ईश्‍वर भालेराव यांच्यासह पालिका कर्मचाऱ्यांनी केली. 

शटर बंद अन्‌ आतमध्ये कारनामे
या दोनही मॉलची शटर बंद होती मात्र त्यांना कुलूप लावण्यात आलेले नव्हते. जनता टॉवरमध्ये ग्राहकांना आत घेण्यात आले होते. कारवाई दरम्यान पथकातील कर्मचाऱ्यांनी दुकानाची पाहणी केली असता. दुकानाच्या वरच्या मजल्यावर ग्राहकांना बसवून ठेवल्याचे लक्षात आले. त्यानंतर कारवाई करण्यात आली. आठवडाभरात नागरिक व व्यवसायिकांना आस्थापने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी ही काही स्थापने उघडी दिसून येत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आगामी काळात आवश्यक सेवा वगळता आस्थापने सुरू आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा आयपीएस अधिकारी अर्चित चांडक यांनी दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com