एमपीएससी परिक्षा..दोन मिनीट उशिर झाल्याने परिक्षेपासून नाकारले

mpsc exam
mpsc exam

जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा पूर्वपरीक्षा घेण्यात आली. जिल्हा प्रशासनाने एकूण १६ उपकेंद्रावर ही परिक्षा घेतली. या परिक्षेत येण्यास केवळ दोन मिनीटांचा उशिर झाल्याने एका परिक्षार्थी विद्यार्थीनीस परिक्षेपासून मुकावे लागून आयूष्यभराचे नूकसान सोसावे लागले आहे. ला.ना.विद्यालयातील परिक्षा केंद्रावर ही विद्यार्थीनी सकाळी ९.३२ ला पोचली. तेव्हा प्रवेशद्वार बंद करतच होते. मात्र संबंधितांनी तिला आत येवू दिले नाही. तिने विनंती केली, रडलीही मात्र उपस्थित अधिकाऱ्यांनी तिला परिक्षेपासून वंचीत ठेवल्याचा प्रकार घडला. दरम्यान आजच्या परिक्षेला तब्बल ५५ टक्के विद्यार्थ्यांनी गैरहजेरी लावली होती. 

शहरातील १६ उपकेंद्रांवर परीक्षा आज ‘एमपीएससी’ची परिक्षा होती. दोन्ही परिक्षेला ६ हजार २६१ परीक्षार्थी उमेदवार होते. प्रथम सत्र सकाळी दहा ते दुपारी बारा व द्वितीय सत्र दुपारी तीन ते सायंकाळी पाच, या वेळेत होते. जिल्ह्यातून सहा हजार २६४ परीक्षार्थी परीक्षा देणार असून, जिल्ह्यातील एकूण ४८९ अधिकारी- कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. 

५५ टक्‍के परिक्षार्थी गैरहजर
पहिल्या सत्रात ६२६१ पैकी ३८६० परिक्षार्थी हजर तर २४९१ परिक्षार्थी गैरहजर होते. दुसऱ्या सत्रात ६२६१ पैकी ३८३३ परिक्षार्थी हजर तर २४२८ परिक्षार्थी गैरहजर होते. गैरहजर परिक्षाथींचे प्रमाण ५५ टक्केपेक्षा अधिक होते. याला कारणही तसेच होते. तब्बल तीन वेळा ही परिक्षा पुढे ढकलली होती. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष होता. किती वेळा त्याच त्या परिक्षेचा अभ्यास करायचा. असे सांगत गेल्याच आठवड्यात राज्यभरात परिक्षार्थींनी निदर्शेनेही केली होती. 

विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायराज्ड मोफत 
परिक्षा केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांना कोरेानाची काळजी घेत पेपर द्यावा लागला. यामुळेच सर्व विद्यार्थ्यांना परिक्षा आयोगाकडून मोफत मास्क, सॅनिटायझर, डोक्याला पांढरी बारीक कापड लावण्यास देण्यात आला होता. परीक्षार्थींना सकाळच्या सत्रासाठी साडेआठ ते साडेनऊपर्यंत व दुपार सत्रासाठी दीड ते अडीच या वेळेतच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला गेला सर्व उमेदवारांची थर्मल तपासणी केली गेली. 
 
त्या विद्यार्थिनीचा काय गुन्हा 
ला.ना. शाळेतील परिक्षा केंद्रावर केवळ दोन मिनीटे उशिरा आल्याने परिक्षा केंद्रात प्रवेश न देणाऱ्या अधिकाऱ्यांची माणूसकी कोठे गेली होती ? असा प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. सध्या कोरोना वाढतोय, तिला वेळेवर रिक्षा मिळाली नसेल आणखी काही अडचण असेल म्हणून तिला आयुष्याचे सोने करणाऱ्या परिक्षेपासून वंचीत ठेवायचा एवढा अमानवी प्रकार येथे घडला. ती जेव्हा रिक्षातून उतरत होती तेव्हा नुकतेच गेट लावले जात होते. तिने आत जाण्याचा प्रयतन केला मात्र तिची दया आली नाही. असल्या निष्ठूरतेला काय म्हणावे. विशेष ही विद्यार्थीनी जळगावमधील एका माजी शिक्षणाधिकाऱ्यांची भाची होती. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com