
मुलगी व नातींना सेाडवण्यासाठी स्वतः भगत बालाणी कार घेवून निघाले होते. मित्र, सुरेश मंधान यांना सोबत घेत, मारुती ब्रिझ्झा (एमएच.१९.सीएफ,७१०८) वाहनाने सकाळी घरुन निघाले.
जळगाव : महापालिकेत भाजपचे गटनेते असलेल्या भगत बालाणी यांच्या कारला सोनगड (गुजरात) जवळ अपघात झाला. कार दुभाजकावर उलटून चेंदामेंदा झाली. भगत बालाणी चालवत असलेल्या या कारमध्ये त्याची मुलगी, दोन नात आणि मित्र असे पाच लोक होते. अपघातानंतर कारने दोन पलट्या घेतल्यानंतरही एअरबॅग उघडल्याने आतील सर्वजण वाचले.
सिंधी कॉलनी येथील रहिवासी, भाजप नगरसेवक भगत बालाणी यांची मुलगी सोनम संजणानी अहमदाबाद (गुजरात) येथे वास्तव्यास आहे. सोनम या त्यांच्या दोन्ही मुलींसह माहेरी जळगावला आल्या होत्या. मुलगी व नातींना सेाडवण्यासाठी स्वतः भगत बालाणी कार घेवून निघाले होते. मित्र, सुरेश मंधान यांना सोबत घेत, मारुती ब्रिझ्झा (एमएच.१९.सीएफ,७१०८) वाहनाने सकाळी घरुन निघाले.
कारवरचे नियंत्रण सुटले
प्रवासातच दुपारच्या जेवणानंतर वाहन सोनगड- व्यारा दरम्यान दुपारी दीड वाजेच्या सुमारास चालक भगत यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले अन् क्षणार्धात कारने देान-तीन वेळा पलट्या घेतल्या. अपघातात भगत बालाणी बेशुद्ध झाले. सुरेश मंधाण, मुलगी सेानम संजणानी, नाती जिनीशा (वय-९), त्रिशा (वय-२) यांना किरकोळ दुखापत झाली असून जवळच्या पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
संपादन ः राजेश सोनवणे