परराज्यातून येण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणी आवश्‍यक

परराज्यातून येण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणी आवश्‍यक
rtpcr test
rtpcr testrtpcr test

जळगाव : महाराष्ट्राबाहेरील जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी आवश्‍यक आहे. जळगाव जिल्ह्याच्या हद्दीत येण्यासाठी त्यांनी ४८ तास अगोदर ही चाचणी करून त्याचा निगेटिव्ह अहवाल असेल तरच त्यांना जिल्ह्याच्या सीमेवरून जळगाव जिल्ह्यात प्रवेश देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत. तशा सूचना सर्व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.

rtpcr test
वादळी तडाखा..दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्‍यू; झोपडीवर पडले झाड

‘ब्रेक द चेन’अंतर्गत महाराष्ट्राबाहेरील कोणत्याही व्यक्‍तीस, तसेच वस्तू व सेवांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे चालक व क्लीनर (कार्गो वाहतूक) यांना महाराष्ट्रात प्रवेश करण्याकरिता कोविड चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक केलेले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील ज्या तालुक्यांच्या सीमा थेट परराज्याशी संलग्न आहेत, ज्या तालुक्यांच्या सीमा थेट परजिल्ह्याशी संलग्न आहेत त्या त्या ठिकाणच्या सर्व चेकपोस्टवर जळगाव जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या परराज्यातील व्यक्तीचा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल तपासणे आवश्यक आहे, जेणेकरून कोविडचा प्रादुर्भाव वाढणार नाही. यासाठी संबंधित तहसीलदार तथा इन्सटंट कमांडर यांनी त्यांच्या स्तरावरून एक विशेष कार्यकारी दंडाधिकारी नेमून संबंधित चेकपोस्टवर स्थानिक पोलिस प्रशासनाच्या मदतीने तपासणी पथक कार्यान्वित करण्यात यावे. या निदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सर्व संबंधितांना सक्त सूचना देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

बाजार समित्यांना आदेश

जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांत भाजीपाला, फळांच्या लिलावाच्या वेळा व विक्रीच्या वेळा वेगवेगळ्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तेथे अधिक गर्दी होणार नाही व कोरोना वाढणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आदेश बाजार समितीच्या सचिवांना दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com