पाचोरा व भडगावला १९ ठिकाणी साठवण बंधारे 

sathvan bandhara
sathvan bandhara

पाचोरा (जळगाव) : पाचोरा-भडगाव मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पाचोरा व भडगाव तालुक्यातील गावांमध्ये १९ साठवण बंधारे होणार असून, यासाठी १७ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. आमदार किशोर पाटील यांनी या संदर्भातील प्रस्ताव शासनदरबारी सादर केला होता व त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्याने या कामांना व निधीस मंजुरी मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे. 
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाचोरा व भडगावला १९ ठिकाणी १७ कोटी रुपये खर्चाचे साठवण बंधारे (सिमेंट बांध) कामांना मंजुरी मिळाली असून, लवकरच या कामांना सुरवात होणार आहे. यामुळे सिंचनक्षमता वाढण्यास चालना मिळणार आहे. पर्यायाने मतदारसंघ सुजलाम्‌ सफलाम्‌ होण्यास हातभार लागणार आहे. ही कामे मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकार्य मिळाल्याने त्यांचे आभार व्यक्त होत आहेत. 

येथे होणार बंधारे
नेरी, दुसखेडा, पिंप्री, संगमेश्वर, होळ येथे प्रत्येकी एक, सातगाव डोंगरी येथे तीन, भडगाव, गुढे, चिंचखेडा खुर्द, टाकळी बुद्रुक, पाचोरा, वडगाव टेक येथे दोन, खाजोळा येथे तीन, नगरदेवळा येथे दोन अशा १९ साठवण बंधाऱ्यांच्या कामांना व १७ कोटी निधीस मंजुरी मिळाली आहे. यामुळे सिंचनक्षेत्र क्षमता वाढून त्याचा फायदा खरीप व रब्बी उत्पादनासाठी होणार असल्याने व बागायती क्षेत्रात वाढ होणार असल्याने शेतकरी आनंदले आहेत. आमदार किशोर पाटील यांचे अभिनंदन होत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com