पारोळ्यात ३० पैकी १८ ‘गावकारभारी’ महिला 

Sarpanch
Sarpanch

पारोळा (जळगाव) : तालुक्यातील ५८ पैकी ४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ५८ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाची तीन टप्प्यात निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यात शुक्रवारी (ता. १२) १२ ग्रामपंचायतीच्या तर सोमवारी (ता. १५) ३० ठिकाणच्या सरपंच, उपसरपंच निवडणुका पार पडल्या. त्यात अठरा ग्रामपंचायतीचा गाव कारभार महिलांच्या हाती देण्यात आला आहे. 
सोमवारी ३० ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व गावाची नावे पुढील प्रमाणे : पिंपळकोठे : सरपंच - वर्षा पाटील, उपसरपंच प्रतिभा पाटील. महाळपुर : सरपंच - सुधाकर पाटील, उपसरपंच धर्मेंद्र पाटील. चिखलोद बुद्रुक : सरपंच - महिंद्रा भिल, उपसरपंच धुडकू पाटील. बाभळेनाग : सरपंच - ज्ञानेश्वर माळी, उपसरपंच दीपक ठाकूर. उंदिरखेडे : सरपंच गणेश पाटील, उपसरपंच शेख अलमास कौसर. सुमठाणे : सरपंच सविता पाटील, उपसरपंच भैय्या पाटील. देवगाव : सरपंच समीर पाटील, उपसरपंच सुधाकर पाटील. चोरवड : सरपंच शीतल पाटील, उपसरपंच शैला पाटील. शिवरेदिगर : सरपंच रंजना पाटील, उपसरपंच दरूबाई पाटील. 
सावळखेडे : सरपंच पुनम खैरनार, उपसरपंच अनुश्री पाटील. बोदर्ड : सरपंच जितेंद्र पाटील, उपसरपंच वनमाला पवार. इंधवे : सरपंच जितेंद्र पाटील, उपसरपंच उषा पाटील. मुंदाणे प्र.अ. : सरपंच दिपाली पाटील, उपसरपंच रेखाबाई मराठे. बाहुटे : सरपंच ज्‍योतीबाई पाटील, उपसरपंच कमलबाई पाटील. तरवाडे खुर्द : सरपंच मंगलाबाई पाटील, उपसरपंच जगन्नाथ चौधरी. अंबापिंप्री : सरपंच शुभांगी माळी, उपसरपंच किरणकुमार कचवे. 
मोरफळ : सरपंच सीमा पाटील, उपसरपंच गणेश माळी. आडगाव : सरपंच शांताबाई मोरे, उपसरपंच भास्कर शेलार. टेहु : सरपंच लिना मोरे, उपसरपंच कलाबाई भिल. भिलाली : बेबाबाई पाटील, उपसरपंच भिमाबाई कोळी. हिरापूर : सरपंच नेहा पाटील, उपसरपंच सुरेश पाटील. कोळपिंप्री : सरपंच पुजा पाटील, उपसरपंच शशिकांत पाटील. विचखेडे : सरपंच मनिषा पानपाटील, उपसरपंच गणपत गायकवाड. शिरसोदे : सरपंच रमेश सैंदाणे. ढोली : सरपंच सिमाबाई पाटील, उपसरपंच ज्योतीबाई पाटील. सार्वे बु. : सरपंच लिलाबाई पाटील, उपसरपंच गरर्जीबाई राठोड. पळासखेडे बु : सरपंच कांतीलाल शिंदे, उपसरपंच लिलाबाई पाटील, बहादरपुर : सरपंच भिकन पारधी, उपसरपंच परेश चौधरी. भोलाणे : सरपंच अनिता पाटील, उपसरपंच अरुण पाटील. शेळावे बु. : सरपंच अर्पणा पाटील, उपसरपंच मुरलीधर बिऱ्हाडे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com