आगीने संपुर्ण घराचा कोळसा; अवघ्‍या तासाभरात कुटूंब रस्‍त्‍यावर

home fire
home fire

पारोळा (जळगाव) : म्हसवे (ता. पारोळा) येथील एका घराला सकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामुळे गरीब कुटुंब रस्त्यावर आले असुन संसारोपयोगी साहित्यासह कपाशी विकलेल्याचे तब्बल दीड लाख रुपये देखील आगीत जळाल्याने 10 लाख रुपयांचे नुकसान झाले.

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार म्हसवे येथील विमलबाई धना भिल यांच्या घराला सकाऴच्या सुमारास शाँर्टसर्किटने आग लागली. आग लागल्‍याचे समजताच महिलेने मदतीसाठी धाव घेतली. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्याने आग आटोक्यात येत नव्हती. ग्रामस्थांनी मिळेल तेथून पाणी आणत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य जळुन खाक झाले. पालिकेच्या अग्नीशामक बंब आल्‍यानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत घरातील सर्व सामान जळून कोळसा झाला होता. घरात एकटी असलेल्या विमलबाई भिल या आग विझविण्यासाठी धडपड करित होत्या मात्र आगीचे रुद्र अवतार पाहुन सर्वजण हतबल झाले होते.

कपाशीचे रोख रक्कम जळुन खाक 
विमलबाई भिल यांनी यंदा शेतात कापुस पेरला होता. तो विकुन साधारण दीड लाख रूपये इतकी रक्कम घरातच होती. दोन- तीन दिवसांनी आलेले पैसे ज्याचे त्याचे देवु असे नियोजन त्यांनी करुन ठेवले होते. मात्र अचानक लागलेल्या आगीमुळे कपाशीचे दीडलाख रुपये जळुन खाक झाल्याने विमलबाई भिल यांचे आशेवर पाणी फिरले.

पंचनाम्‍यात नुकसानीचा आकडा
सदर घटनेची माहिती कळताच पोलिसांसह सरपंच ज्योती संदानशिव, सतीष संदानशिव, ग्रामपंचायत सदस्य पंकज पाटील, प्रदीप पाटील, गजानन पाटील, विजय पाटील यांचेसह ग्रामस्थांनी सहकार्य केले. यावेळी तलाठी गौरव लांजेवार व मंडऴ अधिकारी शांताराम पाटील यांनी घटनेची माहिती घेत तब्बल 10 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा पंचनामा करणार असल्याची माहिती दिली. याबाबत पोलिस अकस्मात आगीबाबत नोंद केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

गरीब भिल कुटुंब रस्त्यावर 
विमलबाई भिल यांचे घराला आग लागल्यामुळे संपुर्ण कुटुंब रस्त्यावर आले आहे. मदतीबाबत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगण्यात आले.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com