esakal | फडणवीस अन्‌ महाजनांचा कित्‍ता सेम; पण उसन्या अवसानाचा फुगा फुटलाच
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत इतर पक्षांतील अनेकांना प्रवेश देऊन तब्बल १०५ आमदार निवडून आणले होते. त्या बळावर एकहाती सत्ता मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र विरोधी पक्षाने आपल्या पक्षातील फुटिरांचे उट्टे काढून भाजपला धडा देण्यासाठी चक्क शिवसेनेशी युती

फडणवीस अन्‌ महाजनांचा कित्‍ता सेम; पण उसन्या अवसानाचा फुगा फुटलाच

sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव : जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाला आपली सत्ता गमवावी लागली. तसे पाहिले तर भाजपनेही इतर पक्षांतील नगरसेवक घेऊन बहुमताच उसने अवसान आणले होते. गुरुवारी ३० नगरसेवकांनी बंड करून भाजपचा फुगा फोडला आहे. 
भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत इतर पक्षांतील अनेकांना प्रवेश देऊन तब्बल १०५ आमदार निवडून आणले होते. त्या बळावर एकहाती सत्ता मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र विरोधी पक्षाने आपल्या पक्षातील फुटिरांचे उट्टे काढून भाजपला धडा देण्यासाठी चक्क शिवसेनेशी युती करून राज्यात सत्ता स्थापन केली. यामुळे भाजपला विरोधी पक्ष म्हणून काम करावे लागत आहे. म्हणजे नेत्यांची आयात करूनही त्यांच्या हाती सत्ता आलीच नाही. 

मनपा आणि राज्‍यातील कित्‍ता सारखाच
अगदी हाच कित्ता जळगाव महापालिकेत देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिकेत गिरविला त्यांनी महापालिकेत निवडणुकीअगोदर भारतीय जनता पक्षात इतर पक्षांतील नगरसेवकांचे जोरदार इन्कमिंग केले. त्यांना निवडणुकीत उमेदवारी दिली. ७५ पैकी तब्बल ५७ नगरसेवक निवडून आणून भाजपची एकहाती सत्ता स्थापन केली. राज्यात भाजपची सत्ता होती. हाती पालकमंत्रिपद होते. त्यामुळे महाजन यांना हे शक्य झाले. परंतु पक्षाचे उसने अवसान आहे, हा केवळ फुगा आहे. तो फुटणार हे दिसत होते. 

शिवसेना नेत्‍यांचे लक्ष अन्‌ खडसेंनी साधली संधी
राज्यात हाती सत्ता नसल्याने महाजन यांना आता मपालिकेवर नेतृत्व करण्यात अनेक अडचणी येत असल्याचे दिसत होते. त्यातच नगरसेवकांची नाराजी वाढली होती. पक्षातील खडसे यांच्यासारखे दिग्गज व्यक्तिमत्त्व विरोधी राष्ट्रवादी पक्षात सामील झाले. त्यामुळे भाजपला विरोध अधिक वाढला. पक्षात नागरसेवकांत होत असलेला असंतोष रोखण्यात महाजन यांना यश आले नाही. नाराज नगरसेवकांनी महापालिकेतील विरोधी व राज्यातील सत्ताधारी शिवसेना पक्षाशी संधान साधले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्ष घातले तर भाजपला झटका देण्याची ही संधी एकनाथ खडसे यांनी साधली. त्यामुळे भाजपतील तब्बल २७ नगरसेवकांनी बंड करून महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजपला पराभूत करून महापालिकेवरील सत्ता खालसा केली. इतर पक्षांतील नगरसेवक आयात करून मिळवलेली सत्ता भाजपला त्याच पद्धतीने गमवावी लागली. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top