भाजपचे ३१ नगरसेवक फुटले..शिवसेनेच्या सोबतीला एमआयएम; जळगाव महापालिकेत होणार सत्‍तांतर

jalgaon corporation
jalgaon corporation

जळगाव : भाजपच्या हातातून शिवसेना एमआयएमला सोबत घेवून आपली सत्‍ता स्‍थापन करण्याच्या तयारीत आहे. अर्थात एमआयएम, शिवसेना व भाजपचे फुटलेले नगरसेवक मिळून 45 संख्या होत असून ते सत्ता स्थापन करणार आहेत. त्यामळे महापालिकेत सत्तांतर निश्चित असल्‍याचे मत माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 
  
जळगाव महापालिकेत कधी नव्‍हे ती भाजपला सत्‍ता मिळाली होती. परंतु, ही सत्‍ता पाच वर्ष कायम ठेवण्यात भाजपला जमले नाही. कारण अवघ्‍या अडीच वर्षाच्या कार्यकाळातच भाजपच्या नगरसेवकांमध्ये गट निर्माण झाले आणि आता सत्ताधारी भाजपचे नगरसेवक फुटले आहे. जळगाव महापालिकेत महापौर निवड १८ मार्चला होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्‍या दोन दिवसांपासून जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे तब्बल ३१ नगरसेवक फुटले असून ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत असून खडसेंनी देखील याबाबत स्‍पष्‍ट करताना सांगितले की भाजपचे नगरसेवक नाराज असल्‍याने ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत.

नॉट रिचेबल नगरसेवक मुंबईत
जळगाव महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे २७ नगरसेवक गेल्‍या दोन दिवसांपासून नॅाट रिचेबल झाले आहेत. हे सर्व नगरसेवक मुंबईत गेल्‍याचे सांगण्यात येत असून, ते शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. यानंतर आज आणखी काही भाजपचे नगरसेवक हे शिवसेनेच्या संपर्कात असल्‍याने जळगाव महापालिकेत शिवसेनेची ताकद वाढणार आहे.

चार- पाच दिवसांपुर्वीच नगरसेवकांशी चर्चा : खडसे
भाजपची एक हाती सत्‍ता आहे. परंतु, जळगाव शहराचे चित्र विकासाच्या नव्हे तर अविकासाच्या दृष्‍टीने पावले टाकणारे आहे. भाजप नगरसेवकांकडून अनेक तक्रारी आल्‍या. या असंतोषामुळे भाजपचे नगरसेवक संपर्कात आहेत. जनता नाखुष आहे. कारण नागरीकांना दिलेल्‍या शब्‍दाचे पालन गेल्‍या दोन- अडीच वर्षात झाले नाही. चार- पाच दिवसांपुर्वीच काही नगरसेवकांसोबत चर्चा झाली. सर्वांचे मत असेल तर असे करायला हरकत नाही. यामुळे सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com