esakal | वीजप्रश्‍नी केळी उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात 

बोलून बातमी शोधा

light issue}

उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे तालुका व जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी यांना यापुढील काळात केळीला वेळेवर पाणी मिळून ती जगविण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.

वीजप्रश्‍नी केळी उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात 
sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर (जळगाव) : तालुक्यासह जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना आलेली वाढीव वीजबिले, या वीजबिलांवर वीज वितरण कंपनीने केलेली व्याजाची आकारणी आणि असंख्य शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तोडण्याचा प्रकार याबाबत चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी तालुक्यातील रोझोदा येथील कामसिद्ध मंदिरात परिसरातील शेतकऱ्यांची बैठक गुरुवारी (ता. १८) उशिरा झाली. आगामी काळात या प्रश्नावर संघर्षाची तयारी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले असून, या चळवळीला व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. 
उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे तालुका व जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी यांना यापुढील काळात केळीला वेळेवर पाणी मिळून ती जगविण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. मात्र, असे असताना वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना नवीन वाढीव वीजबिले आली आहेत. चालू वीजबिल बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांच्याही वीजजोडण्या कापण्यात येत आहेत, तसेच वीजबिलांवर व्याजाची आकारणीही सुरू झाली आहे. यामुळे शेतकरी संतप्त आहेत. याविषयावर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बुधवारी (ता. १७) सायंकाळी उशिरा रोझोदा, खिरोदा प्र रावेर, चिनावल, कुंभारखेडा, कळमोदा, कोचूर, सावखेडा बुद्रुक, सावखेडा खुर्द, न्हावी, मस्कावद, गौरखेडा येथील सुमारे अडीचशे शेतकऱ्यांची बैठक झाली. बैठकीत विजय महाजन, दीपक धांडे, डॉ. मिलिंद वायकोळे, रमेश महाजन, रवींद्र चौधरी (रोझोदा), किशोर चौधरी (खिरोदा), बापू पाटील, दामोदर महाजन, घनश्‍याम पाटील, श्रीकांत सरोदे (चिनावल), सी. एच. महाजन, सुनील फिरके (न्हावी), साहेबराव महाजन (सावखेडा), रितेश परदेशी, मनोहर येवले (कोचूर), संदीप चौधरी, नितीन भोगे (मस्कावद) यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा झाली. आगामी काळात रावेर तालुक्यात याप्रश्नी अशाच शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन अधिकाधिक जनजागृती करावी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवावी, असा निर्णय घेण्यात आला. परिसरातील शेतकऱ्यांची संघर्ष समितीही या वेळी स्थापन करण्यात आली. 

आमदारांच्या आवाहनाला प्रतिसाद 
शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार आमदार शिरीष चौधरी यांनी याप्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दूरध्वनीवरून शेतकऱ्यांची अडचण सांगितली व पत्रही लिहिले. त्यात रब्बीचा हंगाम येईपर्यंत वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी केली आहे. या विनंतीला प्रतिसाद देत मंत्रिद्वयांनी वीजपुरवठा खंडित न करण्याचे आणि तोडलेल्या वीजजोडण्या पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर वीजपुरवठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. Associated Media Ids : 

संपादन ः राजेश सोनवणे