निर्यातीसाठी केळी कापणी, पॅकेजिंगसाठी तयार करताय कुशल मजूर

निर्यातीसाठी केळी कापणी, पॅकेजिंगसाठी तयार करताय कुशल मजूर
banana packing
banana packingsakal

रावेर (जळगाव) : विदेशात केळी निर्यात (Banana transport) करायची म्हणजे तिच्या कापणीनंतर खूपच काळजीपूर्वक हाताळणी करावी लागते. यासाठी आतापर्यंत पश्चिम बंगालमधील कुशल मजुरांवर (West bengal worker) अवलंबून राहावे लागते. मात्र, तालुक्यातील तांदलवाडी येथील प्रेमानंद महाजन आणि प्रशांत महाजन बंधूंनी यंदा स्थानिक मजुरांच्या ३ पथकांना स्वतःच त्याचे प्रशिक्षण दिले आहे. भविष्यातही प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम सुरू राहणार असून, अन्य राज्यातील मजुरांवरील अवलंबन ते टप्प्याटप्प्याने कमी करणार आहेत. (raver-mahajan-brother-training-banana-packing-worker)

केळी निर्यातीसाठी तिची व्यवस्थित कापणी आणि पॅकेजिंग (Banana packing) महत्त्वाची असते. कापणीनंतर केळी कुठेही एकमेकांवर किंवा बाह्य वस्तूवर घासली जायला नको. नाहीतर ती जिथे घासली जाते तिथे पिकल्यावर काळी पडते. विदेशात अशी डाग पडलेली केळी कोणीही घेत नाहीत.

banana packing
कोरोनाने पती गमाविलेल्या "ती"च्या जिद्दीला सलाम..!

बंगाली मजूर निष्णात

हे काम अतिशय कौशल्याने पश्चिम बंगालमधील मजूर करतात. साधारणपणे एका पथकात (टोळीत) १६ जण असतात. केळी बागेतील निर्यातक्षम घड निवडून तो काळजीपूर्वक कापणे, त्याची वाहतूक, सफाई, त्याच्या फण्या करणे, बुरशीनाशक पाण्यातून धुणे, हवेने कोरडे करणे आणि वजन करून खोक्यात पॅकिंग करणे अशा स्वरूपाचे हे काम असते.

कोरोनामुळे अडचणी

कोरोनाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात बंगालमधून येणाऱ्या कुशल मजुरांची संख्या कमी झाली आहे. आल्यानंतर त्यांची सर्व व्यवस्था इथे करावी लागते. आणि ते गेल्यावर निर्यात जवळपास थांबते. या पार्श्वभूमीवर तांदलवाडी (ता. रावेर) येथील कृषिभूषण प्रेमानंद महाजन आणि त्यांचे बंधू प्रशांत महाजन यांनी इथल्या स्थानिक मजुरांनाच प्रशिक्षण देण्याचे ठरविले. स्थानिक बाजारपेठेत केळी पाठवितांनाही तिची1 निर्यातीसाठी काळजी घेतात तशी घेण्यात आली. आता तांदलवाडी येथील ५० मजूर निर्यातीसाठी केळी कापणी व पॅकेजिंगमध्ये तरबेज झाले आहेत. ते स्थानिक असल्याने त्यांचे येणे, जाणे, राहणे याची अडचण मिटली. मुख्य म्हणजे त्यांना द्यावी लागणार असलेली मोठी मजुरी परराज्यात न जाता इथल्याच मजुरांना मिळाली. विशेष महाजन बंधूंच्या तांदलवाडी येथील पॅकेजिंग हाऊसमध्ये स्थानिक ६ महिला मजूर निर्यातक्षम केळी पॅक करतात.

केंद्राची योजना कागदावरच

केंद्र सरकारच्या कृषी विभागांतर्गत असलेल्या 'अपेडा'तर्फे स्थानिक मजुरांना निर्यातीसाठी केळी पॅकेजिंग प्रशिक्षण देण्याची योजना प्रस्तावित आहे. मात्र, ३ वर्षांपासून ती कागदावरच आहे. मात्र महाजन बंधूंनी याबाबतीत स्वयंपूर्ण होण्याकडे पाऊल टाकले आहे. यापुढील काळात देखील आणखी काही स्थानिक मजुरांना केळी कापणी आणि पॅकेजिंग याचे प्रशिक्षण देणार असून बंगाली मजुरांवरील अवलंबन कमी करणार असल्याचे प्रेमानंद महाजन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com