तर शेळगाव बॅरेजचे काम बंद पाडू; शेतकऱ्यांचा ईशारा 

shelgaon barrgage
shelgaon barrgage

जळगाव : जळगाव,यावल आणि भुसावळ तीन्ही तालूक्यांसाठी वरदान ठरलेल्या शेळगाव बॅरेजचे काम पुणत्वास आले आहे. प्रकल्पासाठी जमीनीचे भुसंपादन होवुन अद्याप शेतकऱ्यांना मेाबदला मिळालेला नसल्याने २२ रेाजी ३५० वर शेतकरी अंदोलनाच्या तयारीत आहे. 

जळगाव तालूक्यातील मौजे. कडगाव, तिघ्रे शिवारातील शेत जमीन भुसंपादन-२०१८ मध्ये पुर्ण झाले. जिल्‍हा प्रशासनाने त्यासाठी ५० केाटीचा निधी प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना देण्याचा निवाडा २०१८ मध्येच दिला होता. ५० टक्के रक्कम तापी मध्यम प्रकल्प कार्यालयाने प्रांताधिकाऱ्याच्या खात्यात जमा देखील केली होती. तरी, प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना निधीचे वाटप अद्यापही झालेले नसून जिल्‍हा प्रशासन आता कोरोनाचे कारण देत चालढकल करत असल्याने प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. २२ फेब्रुवारी रेाजी शेळगाव बॅरेजचे काम बंद पाडण्यासह, भुसावळ, यावल येथे रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ॲड. महेंद्र चौधरी प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांसाठी पाठपुरावा करत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com