तलाठ्यांकडून दाखले देणे बंद; शेतकऱ्यांसह नागरिकांचे हाल

takathi
takathi

जळगाव ः जिल्‍ह्‍यातील महसूल विभागाचे सर्व्हर अनेक दिवसांपासून अतिशय स्लो रितीने सुरू आहे. एक-एक सातबारा ओपन होण्यास तासनतास लागतात. यामुळे तलाठ्यांना विविध प्रकारचे दाखले देताना अडचणींचा मोठा सामना करावा लागत आहे. शासनाने, जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, स्पीडने चालणारे सर्वर सर्वत्र बसवावे, तोपर्यंत सर्व संगणकीय दाखले न देण्याचा निर्णय तलाठ्यांनी घेतला आहे. दाखले देण्यासाठी डिजीटल सिग्नेचर (डीसीसी) मशिन सर्व तहसिलदारांकडे तलाठ्यांनी जमा केली आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी, सर्वसामान्यांना महसूल विभागातून दाखले मिळणारे झाले आहेत. 

महसूल विभागाचे सर्वर अतिशय स्लो सुरू असते. त्यात अनेकवेळा अनियमतता असते यामुळे तलाठ्यांना सात बारा उतारे देणे, शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पिक पेऱ्याची नोंद करणे, विविध प्रकारच्या नोंदी करणे, यासह इतर दाखले देण्यास विलंब लागतो. मार्च महिना सूरू असल्याने वसूलीची कामे असताना दाखले देणे, नोंदी घेणे आदी कामे करावी लागतात. यात सर्वर बंद असलयाने अधिक वेळे जातो. यामुळे काम करणे कठीण होत आहे. शासनाने, जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालावे. सर्वर जोपर्यंत जलदगतीने सूरू होत नाही तोपर्यंत सातबारा उताऱ्यावर नोंदी लावणे, पिक पेऱ्याची नोंद घेणे, इतर विविध प्रकारचे उतारे देणे अशी कामे होणार नाहीत. याबाबतचे निवेदन जळगाव तालुका तलाठी संघाने आज तहसिलदारांना दिले आहे. सोबतच जोपर्यंत सर्वर जलद गतीने सुरू होत नाही तोपर्यंत डी.सी.सी.जमा करण्यात येत आहे. महसूल विभागातील कामकाज यामुळे ठप्प झाल्या, नोंदीचे काम रखडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहिल असा अशारा देण्यात आला आहे. संघाचे उपाध्यक्ष आर.पी.अहिरे, कार्याध्यक्ष एम.बी.सोनवणे, सचिव एस.एस.पाटील, जिल्हा प्रतिनिधी रूपेश ठाकूर, सहसचिव के.पी.सपकाळे, आर.टी.वंजारी, संदीप डोभाळ आदी यावेळी उपस्थित होते. जळगाव तालूक्यातील ३३ तलाठ्यांनी डी.सी.सी.जमा केले आहे. जिल्ह्यातील इतर तलाठ्यांनी कालच तहसिलदांरांकडे डीसीसी जमा केले आहे. 


संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com