तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार; न्‍यायालयाने दिली मरेपर्यंत जन्मठेप 

court
court

जळगाव : अंगणात खेळत असलेल्‍या तीनवर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार करण्याचा प्रकार घडला होता. दोन वर्षापुर्वी झालेल्‍या या घटनेबाबत सुनावणी झाली असता जिल्‍हा व सत्र न्यायाधीश आर. जे. कटारिया यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 
बेडरपुरा- नगरदेवळा (ता. पाचोरा) येथे तीनवर्षीय बालिका अंगणात खेळत असताना २६ मार्च २०१९ ला संशयित किशोर ऊर्फ पिंटू निंबा भोई याने चॉकलेटचे आमिष दाखवीत घरात नेत अत्याचार केला. घटना कळल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. पाचोरा पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात येऊन संशयित भोई याला अटक करण्यात आली होती. पाचोरा पोलिसांनी तपास पूर्ण करीत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्‍हा सत्र न्यायाधीश न्या. आर. जे. कटारिया यांच्या न्यायालयात कामकाज होऊन सरकारपक्षातर्फे ॲड. केतन ढाके यांनी फिर्यादी, तपासाधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दहा साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. 

अन्‌ चिमुकलीने न्यायालयात सांगितली घटना
सुनावणी सुरू असताना अत्‍याचार झालेल्‍या तीनवर्षीय चिमुरडीने झालेल्या अत्याचाराला अडीच वर्षे पूर्ण होत असतांनाही न्यायालयीन कामकाजाप्रसंगी बाळबोध भाषेत घडला प्रकार जसाच्या तसा मांडला. गुन्ह्याचा अचूक तपास, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अहवाल, साक्षीदारांच्या साक्ष आणि पुराव्यांच्या आधारे संशयित किशोर ऊर्फ पिंटू भोई याच्या विरुद्ध (भादवि कलम-३७६-अ, ब, आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम-२०१२) दाखल गुन्हा सिद्ध झाल्याने न्या. कटारिया यांच्या न्यायालयाने त्यास जन्मठेप आणि २,५०० रुपये दंडची शिक्षा ठोठावली.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com