पुन्हा म्‍हणावे लागतेय..जसा तवा चुलीवर, आधी हाताले चटके..

ujwala yajna
ujwala yajna

वावडे (अमळनेर) : दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दर सर्वसामान्यांना चिंतातुर करत अडचणीत आणणारे ठरत आहेत. इंधन दरवाढीमुळे इतर महागाई देखील वाढत आहे. घरात दैनंदिन लागणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसचे दरही अधिक असल्याने गॅस भरणे देखील कठीण होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अद्यापही चुलीचा वापर केला जात‌ आहे.
‌‌
सध्या पेट्रोलचे दर 91 रुपये तर डिझेल 80 रुपये दरम्यानच्या दरात मिळत आहे. काही वर्षांपूर्वी सर्वसाधारण असणारे हे दर इंधन मागणीतील वाढ व वाहनांच्या भरमसाठ संख्येमुळे देखील कदाचित अधिक होत असतील पण ही इंधन दरवाढ होत असल्याने इतर वस्तूंची भावही वाढत आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहनाने येणारा महाल महागच मिळणार तेव्हा सर्वप्रथम इंधन दरवाढीवर शासनाकडून नियंत्रण मिळवणे गरजेचे झाले आहे. 

उज्‍वला योजना गुंडाळली
पेट्रोल डिझेलचे भाव वाढ सुरू असल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. घरोघरी उज्वला योजनेअंतर्गत शासनाकडून गृहिणीसाठी गॅस वितरित करण्यात आला. चूल मुक्त व मात्र गॅसचे भाव अधिक असल्याने ग्रामीण भागात कित्‍येक नागरिकांनी ते गुंडाळून ठेवत पुन्हा आपल्या परंपरागत चुलीवर स्वयंपाक सुरू केला आहे. महागाईमुळे इंधन वापरणे कठीण होऊन बसले आहे रस्त्यावर वाहन चालवणे खर्चिक झाले असून त्यामुळे खिशाला मोठी कात्री लागत आहे. शेती बद्दल विचार केला तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला मात्र त्याप्रमाणात भाव मिळत नाही; त्यांचा पुरेसा वर्षभराचा खर्चही निघणे कठीण होत आहे. 

इंधनामुळे जीवनावश्‍यक वस्‍तूंचे दर गगनाला
महागाईचा फटका लघू व्यावसायिकांनाही बसत आहे. परदेशातून येणारे इंधन महाग होत आहे. यावर पर्याय शोधणे गरजेचे झाले आहे. इंधन दरवाढीमुळे धान्य डाळी भाजीपाला आधी जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडत आहेत. एकूणच दरवाढीवर अंकुश लावणे गरजेचे झाले आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष पुरवणे महत्त्वाचे आहे. यात सर्वसामान्य जनतेला न सहन होणारा मोठा आर्थिक फटका बसत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com