esakal | वाळू वाहतूक ठरतेय नागरिकांसाठी जीवघेणी; पांझरा नदीतून सर्रास उपसा

बोलून बातमी शोधा

valu upsa}

पांझरा नदीपात्रातील कोणत्याही वाळू पट्ट्याचा अद्याप लिलाव झालेला नाही. त्यामुळे पांझरा पात्रातील वाळूला सोन्याचा भाव आला आहे. मांडळ, मुडी, कळंबू, ब्राह्मणे, भिलाली आदी परिसरात पांझरा पात्रात वाळू चोरांनी अक्षरशा हैदोस घातला आहे.

jalgaon
वाळू वाहतूक ठरतेय नागरिकांसाठी जीवघेणी; पांझरा नदीतून सर्रास उपसा
sakal_logo
By
किशोर पाटील

वावडे (जळगाव) :  पांझरा नदीपात्रात वाळू चोरांनी गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः हैदोस घातला असून नदीपात्रात रात्रीच्या वेळी चोरांनी वाळूचा उपसा करत पांझरापात्र ओरबडली जात आहे. वाळू चोरीसाठी टोळ्या सक्रिय होत असून याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याने चोरांचे मनोधैर्य वाढले आहे. दरम्यान मध्यरात्री धावणाऱ्या ट्रकमुळे रस्त्याच्या शेजारी असलेल्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
पांझरा नदीपात्रातील कोणत्याही वाळू पट्ट्याचा अद्याप लिलाव झालेला नाही. त्यामुळे पांझरा पात्रातील वाळूला सोन्याचा भाव आला आहे. मांडळ, मुडी, कळंबू, ब्राह्मणे, भिलाली आदी परिसरात पांझरा पात्रात वाळू चोरांनी अक्षरशा हैदोस घातला आहे. विविध यंत्रांच्या सहाय्याने उपसा करून वाहनांद्वारे वाळू चोरी करणाऱ्या लोकांनी पांझरा पात्र ओरबडण्यास सुरुवात केली आहे. चोरी करण्यासाठी आता वाळू चोरांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून रात्री उशिरापर्यंत उपसा सुरू असतो. 

भरारी पथक नावालाच
वाळू चोरीला पायबंद घालण्यासाठी प्रशासनाचे असलेले भरारी पथक नावालाच उरले असून या पथकाला न जुमानता वाळू चोरी होत असल्याने पथकाचा काय उपयोग असा प्रश्न नागरिकांत चर्चिला जात आहे. दरम्यान काही दिवसापासून बंद असलेली चोरी पंधरा दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाढली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू चोरांची धाडस वाढले आहे. गोदावरी पात्र उजळ करण्यासाठी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या चोरांवर कोणाचाही वचक राहिला नसल्याने यांच्यावर जिल्हा अधिकारी व ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालून कडक कारवाई करावी व वाढत्या वाळू चोरीला वेळीच लगाम घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नदीतून जेसीबीने वाळू उपसा
पांझरा नदीच्या पात्रात दिवस- रात्र जेसीबीच्या सहाय्याने बिनधास्तपणे वाळू उपसा सुरू आहे. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सर्रासपणे सुरू असूनही महसूल प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
       
महसुलचे नुकसान
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून हा वाळू उपसा सुरू आहे. मात्र महसूल प्रशासन अधिक आहे याकडे लक्ष देत नसल्याने वाळू वाहतूकदारांना रान मोकळे झाले आहे. यात कारवाई व्हावी महसूल विभागाची ही लाख रूपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

संपादन ः राजेश सोनवणे