Womens day 2021 : खानदेशातून एकमेव महिला कार्डियाक भूलतज्ज्ञ; एक संधी द्या म्‍हणते त्‍याचे केले सोने

dr varsha kulkarani
dr varsha kulkarani

जळगाव : आत्‍मविश्‍वासाने सारे काही जिंकता येते, असे म्‍हटले जाते. हे सर्वांनाच जमते असे नाही. त्‍यात महिला असली तर घर, संसार, मुलं यातून ध्येय गाठता येणे जरा कठीणच. अशातही बायपास शस्‍त्रक्रिया करण्याच्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका अर्थात भूलतज्ज्ञ म्‍हणून कामगिरी बजाविण्यात महिला डॉक्‍टर नसण्यासारखेच आहेत. पण खानदेशातून एकमेव महिला कार्डियाक भूलतज्ज्ञ म्‍हणून डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी आपले एक वेगळे नाव उमटविले आहे. 
जळगावातील डॉ. वर्षा वारके- कुलकर्णी यांनी जळगावातीलच नव्हे, तर पुणे, नाशिक येथील मोठ्या रुग्‍णालयांत बायपास शस्‍त्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजाविली आहे. कारण हृदयविकाराचा झटका आल्‍यानंतर रुग्‍णावर शस्‍त्रक्रिया करण्यापूर्वी द्यावी लागणारी भूलही तितकीच महत्त्वाची आहे. अर्थात, भूल देताना थोडी जरी चूक झाली तरी ते रुग्‍णाच्या जिवावर बेतू शकते. पण, या कठीण प्रसंगाच्या वेळी डॉ. वर्षा कुलकर्णी या अगदी यशस्‍वीपणे सामोरे जात आहेत. त्‍यांच्या कामगिरीच्या बळावर त्‍यांना २०१५ मध्ये राज्‍य शासनाने पुरस्‍कार देवून सन्मानित केले आहे. 
 
हजारो यशस्‍वी शस्‍त्रक्रिया 
ध्येय कोणतेही असो ते गाठण्याची जिद्द कायम मनाशी बाळगणाऱ्या डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर १९९९ मध्ये पुणे येथून एम. डी. अनस्‍थेशिया केले. यानंतर रूबी हॉस्‍पिटलमध्ये कार्डियाक भूलतज्ज्ञ म्‍हणून प्रॅक्‍टिस करण्यास सुरवात केली. तेथे साधारण चार वर्षे सहाय्यक आणि स्‍वतःदेखील जबाबदारी सांभाळत शस्‍त्रक्रिया करण्यात आपली भूमिका बजावली. यानंतर जळगावातच आपली सेवा देण्याच्या उद्देशाने जळगावात येऊन सेवेस सुरवात केली. साधारण २३ वर्षे सेवा देत आतापर्यंत हजारो शस्‍त्रक्रिया पूर्ण केल्‍या आहेत. 
 
पहिल्‍या संधीचे सोने 
रूबी हॉस्‍पिटलमध्ये प्रॅक्‍टिस सुरू करतेवेळी एक महिला म्‍हणून काय करणार, अर्ध्यातून सोडून देणार, असे म्‍हटले जात होते. कारण त्‍या वेळी सहा महिन्यांची मुलगी घरी सोडून प्रॅक्‍टिस करण्याची जबाबदारीदेखील डॉ. वर्षा यांना सांभाळायची होती. जबाबदारी सांभाळण्यास सक्षम असल्‍याचा आत्‍मविश्‍वास असल्‍याने त्‍यांनी डॉक्‍टरांना कोणतीही तक्रार येऊ देणार नाही, असे सांगत एक संधी मागितली. या मिळालेल्‍या संधीचे सोने डॉ. वर्षा यांनी केले आणि आज खानदेशातील एक यशस्‍वी कार्डियाक भूलतज्ज्ञ महिला म्‍हणून त्‍यांचे नाव घेतले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com