‘न्यायाधीश विरुद्ध न्यायाधीश’; उच्च न्यायालयाच्या आदेशाच्‍या अवमानाचा आरोप

‘न्यायाधीश विरुद्ध न्यायाधीश’; उच्च न्यायालयाच्या आदेशाच्‍या अवमानाचा आरोप
‘न्यायाधीश विरुद्ध न्यायाधीश’; उच्च न्यायालयाच्या आदेशाच्‍या अवमानाचा आरोप

यावल (जळगाव) : येथील प्रथमवर्ग न्यायालयात प्रथमवर्ग न्यायाधीशांच्या (Yawal court judge)अधिकारावर गदा आणत उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा आरोप प्रथमवर्ग न्यायाधीश डी. जी. जगताप यांनी सहदिवाणी न्यायाधीश एम. एस. बनचरे यांच्यावर केला आहे. याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयाकडे तक्रार करण्यात आली असून, सहदिवाणी न्यायाधीशांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. हा गुंता एकाच वेळी सहदिवाणी न्यायाधीश व प्रथमवर्ग न्यायाधीश यांच्या जिल्हा व उच्च न्यायालयातून (High court) झालेल्या आदेशामुळे वाढला आहे. (yawal-court-Judge-Allegation-of-contempt-of-High-Court-order)

‘न्यायाधीश विरुद्ध न्यायाधीश’; उच्च न्यायालयाच्या आदेशाच्‍या अवमानाचा आरोप
भिषण घटना.. जळगावात कंटरनेने बाप-लेकाला चिरडले !

येथील न्यायालयामध्ये प्रथमवर्ग न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले न्यायाधीश डी. जी. जगताप यांना प्रशासकीय कारणावरून फेब्रुवारीमध्ये निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या निलंबनाला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने ७ जूनला आदेश काढत त्यांना पुन्हा आपल्या पदावर यावल न्यायालयात हजर करून घेण्याचे आदेश दिले. हे आदेश ९ जूनला प्राप्त झाले.

असा केला आरोप

आदेश प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाच्या कक्ष अधीक्षकांना आदेशाची माहिती देऊन आपणास हजर व्हायचे आहे तेव्हा आपले चेंबर सज्ज ठेवावे, अशा सूचना न्यायाधीश जगताप यांनी केल्या. मात्र, येथील प्रभारी न्यायाधीश एम. एस. बनचरे यांनी त्यांना हजर होऊ दिले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा आरोप व तक्रार जिल्हा न्यायालयाकडे केल्याचे शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी उशिरा न्यायाधीश जगताप यांनी पत्रकारांना सांगितले. आपल्या अधिकारापासून सहदिवाणी न्यायाधीश बनचरे यांनी आपणास वंचित ठेवल्याचा आरोप न्यायाधीश जगताप यांनी केला आहे.

‘न्यायाधीश विरुद्ध न्यायाधीश’; उच्च न्यायालयाच्या आदेशाच्‍या अवमानाचा आरोप
उपचारासाठी पहिल्या क्रमांकाचे रुग्णालय करणार : अधिष्ठाता डॉ. रामानंद

जिल्हा न्यायालयाकडून आपणास प्रथमवर्ग न्यायाधीश म्हणून याच न्यायालयात काम सोपविण्यात आले आहे. तेव्हा ९ जूनला न्यायाधीश जगताप यांच्या संदर्भातील आदेश प्राप्त झाले. मात्र, त्यांच्यासाठी बैठकव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. असेही त्यांच्याकडे डायसवरील काम नव्हते. ते कक्षात येऊन बसू शकले असते तर त्यांना बसण्याकरिता आपण रोखले नसते. त्यांच्या संदर्भात स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यावा, याबाबत जिल्हा न्यायालयाकडून मार्गदर्शन मागविले आहे.

- एम. एस. बनचरे, सहदिवाणी न्यायाधीश, यावल

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर १० जूनला आपण कक्ष अधीक्षकांना आपण आहे त्या पदावरील कक्ष आणि डायस रिकामे करून ठेवावे, अशा सूचना केल्या होत्या. मात्र, न्यायाधीश एम. एस. बनचरे यांनी जिल्हा न्यायालयाचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करू, असे सांगून त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून स्वतः दिवाणी न्यायाधीश असताना प्रथमवर्ग न्यायाधीशांचा कक्ष वापरून आपल्याला कर्तव्यापासून वंचित ठेवले आहे.

- डी. जी. जगताप, प्रथमवर्ग न्यायाधीश, यावल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com