तो आणि ती दोघेही अल्पवयीन...अन होत्याचे नव्हते झाले....

child marriage
child marriage

अमळनेर- ती अल्पवयीन होती... अन तो पण अल्पवयीन...  सर्व काही नियोजनानुसार होणार होते, मात्र दोघांना कायद्याचा धाक दाखविला... अन होत्याचे नव्हते झाले. ही घटना आहे लोणे-भोणे  (ता.अमळनेर) येथील बालविवाहाची. 

लोणे-भोणे येथील भिवदास सोनू अहिरे यांचा मुलगा समाधान (वय १८) याचे लग्न निलचंद गायकवाड (रा.चांदसर ता.धरणगाव) यांची मुलगी ज्योती (वय १७) हिच्याशी जमले होते.  त्यानुसार आज हा विवाह लोणे (ता.अमळनेर) येथे आयोजित करण्यात आला होता. दोन्ही कुटुंबियांकडून विवाहाची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. लग्नाच्या ब्रम्हगाठी ह्या स्वर्गातच बांधलेल्या असतात. जे होतं ते विधी लिखित होते. त्याला कोणीही बदलू शकत नाही याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला. लोणे येथे बालविवाह होणार होता, ही बाब वर वधू यांच्या नातेवाईकांसह गावकऱ्यांनाही माहिती होती. गुपचूप विवाह करून घेऊ या मनोवृत्तीत दोन्ही कुटुंब होते. मिया बीबी राजी तो क्या करेगा काझी याचाच प्रत्यय येईल की काय? असे वाटत असतानाच बालविवाह होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. जे व्हायला नको तेच होत होते.  त्यानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षण अधिकारी योगिता चौधरी यांनी लोणे हे गाव गाठले.  ग्रामसेवक नरेश सुर्यवंशी, पोलीस पाटील, पुना पाटील, सरपंच कविता पाटील, पोलीस शिपाई गायकवाड यांच्या सहकार्याने त्या  विवाहबद्दल शहानिशा केली. यावेळी अधिक चौकशी केली असता वरपित्याने वर तसेच वधू हे दोघी अल्पवयीन असल्याचे मान्य केले. त्यानुसार संरक्षण अधिकारी श्रीमती चौधरी यांनी बालविवाहाबाबत समुपदेशन करून बालविवाह प्रतिबंध कायद्याची उपस्थितांना माहिती दिली. बाल विवाह कसा चुकीचा आहे याची संपूर्ण माहिती दिली. वर व वधू या दोघांचे विवाह करण्या योग्य वय असेल तर हरकत नाही. मात्र सत्य परिस्थिती ची अशी होती की  वर व वधू हे अल्पवयीन होते. दोन्ही कडील व्यक्तींचे समपुदेशन झाल्याने हा बालविवाह थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. आपसात समेट झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही. समाजात आज ही अनेक ठिकाणी बाल विवाह होत असतात. अश्या बालविवाहाना रोखणे प्रत्येक नागरिकांचे आद्यकर्तव्य आहे, हा सामाजिक संदेश ही या घटनेतून मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com