
दिवाळी हा सण जोरात साजरा करता येईल अशी अपेक्षा भेट घेऊन केली आहे. यावेळी पणन व सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ग्रेडर उपलब्धता कमी असून अमळनेर तालुक्यासाठी ग्रेडर उपलब्ध करून त्वरित कापूस खरेदीबाबत कार्यवाही करण्याचे आदेश केले.
अमळनेर: तालुक्यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार अनिल पाटील यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मुंबईत केली आहे. त्यावेळी त्यांनी खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आदेश दिले आहेत.
आवश्य वाचा- ‘कोरोना’पासून कोसो दूर असेही एक गाव !
याबाबत बाळासाहेब पाटील यांची मुंबईत भेट घेऊन निवेदन दिले व यावेळी आमदार पाटील यांनी तालुक्यातील सध्या परिस्थिती सांगितली त्यात अमळनेर कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रात यावर्षी 38 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली असुन त्यापासुन अंदाजे 22 लाख 80 हजार क्विंटल कापूस उत्पादित होत आहे. अद्याप पावेतो अमळनेर क्षेत्रात कापुस खरेदी केंद्र सुरु न झाल्याने अमळनेर येथे रोज शेकडो शेतकरी कापूसकेंद्र सुरू झाले का..? या चौकशीसाठी येत असतात.
अमळनेर कार्यक्षेत्रात आज घडीला 5 परवानाधारक जिनिंग असुन शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी तात्काळ व वेगाने व्हावी व सदर योजनेचा लाभ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना व्हावा यासाठी जास्तीत जास्त शासकिय जिनिंग केंद्र तालुकास्तरावर सुरु करावे. यामुळे तालुक्यातील साधारणतः 70 हजार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल तरी योग्य कार्यवाहीसाठी तात्काळ आपण संबंधित पणन विभागाला आपल्या स्तरावरुन आदेश देऊन शेतकऱ्यांना कापूस विक्री करता येईल व दिवाळी हा सण जोरात साजरा करता येईल अशी अपेक्षा भेट घेऊन केली आहे. यावेळी पणन व सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ग्रेडर उपलब्धता कमी असून अमळनेर तालुक्यासाठी ग्रेडर उपलब्ध करून त्वरित कापूस खरेदीबाबत कार्यवाही करण्याचे आदेश केले. त्यामुळे लवकरात लवकर अमळनेर तालुक्यासाठी खरेदी केंद्र सुरू होणार आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे