esakal | खानदेशच्या सुपुत्राचा गुजरात मध्ये डंका ! दुसऱ्यांदा नगरसेवक पदी विजयी
sakal

बोलून बातमी शोधा

खानदेशच्या सुपुत्राचा गुजरात मध्ये डंका ! दुसऱ्यांदा नगरसेवक पदी विजयी

जनसेवेने पुन्हा नगरसेवक म्हणून बहुमताने निवडून दिल्याने खानदेशाचा डंका गुजरात राज्यात झाला..

खानदेशच्या सुपुत्राचा गुजरात मध्ये डंका ! दुसऱ्यांदा नगरसेवक पदी विजयी

sakal_logo
By
प्रा.हिरालाल पाटील

कळमसरे ः कळमसरे (ता.अमळनेर) येथील रहिवासी व गेल्या २७ वर्षापासून व्यवसायानिमित्त उधना येथे वास्तवास असलेले सुधाकर लोटन चौधरी यांची नुकत्याच झालेल्या सुरत महापालिका निवडणुकीत सलग दुसरयांदा नगरसेवकपदी विजयी झाल्याने खानदेशाचा सुपुत्राचा गुजरात राज्यात डंका वाजल्याने काल कळमसरे गावात सर्व समाज बांधवानी आनंदोत्सव साजरा केला.

आवर्जून वाचा- पाच महिने उलटले तरी शेकडो केळी उत्पादक शेतकरी वंचित 
 

२७ वर्षांपूर्वी गाव सोडून सुरत येथे स्थायिक झाले. मिळेल त्याठिकाणी काम करून कालांतराने मंडप व्यवसायाला सुरुवात केली असता त्यातच सामाजिक कार्याची आवड यात ते मागील गेल्या सोळा वर्षापासून माळी समाजाचे अद्यक्ष आहेत. गेले पंधरा वर्षांपासून ते सर्व समाजाचे विनामूल्य सामुदायिक विवाह सोहळा ते घेत आहेत.

दुसऱ्यांदा नगरसेवक

अडल्या नडल्या ना गरजुना मदत करण्यासाठी तत्पर असल्याने सुरत महानगरपालिकेत त्यांना दुसर्यादा बहुमताने निवडून दिले.त्यांनी कोरोना काळात सतत तीन महिने गरजूना मोफत लाखो रुपयांचे अन्न-धान्य ,किराणा, जेवण आदी सुविधा पुरविल्या होत्या.मागील पंचवार्षिक काळात त्यांची पत्नी दक्षा चौधरी या सुरत महानगरपालिकेत आरोग्य उपसभापती म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या जनसेवेने पुन्हा नगरसेवक म्हणून बहुमताने निवडून दिल्याने खानदेशाचा डंका गुजरात राज्यात झाल्याने कळमसरे ग्रामस्थांनी  विजयोत्सव साजरा केला.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image