गुरू, शुक्र अस्‍त असला तरीही यंदा लग्नसराईला ‘नो ब्रेक’ 

marriage
marriage

वावडे (ता. अमळनेर) : कार्तिकी एकादशी व द्वादशी गुरुवारी एकाच दिवशी झाली. तुलसीविवाहानंतर आता लग्नसराईला सुरवात झाली आहे. लग्नाचा पहिला मुहूर्त शुक्रवारी (ता. २७) होता. कोरोनाच्या घातलेल्या नियम व अटींमुळे धामधूम नसली तरी साध्या पद्धतीने विवाहाची गर्दी असेल. 
शयनी (आषाढी) ते प्रबोधिनी एकादशी या काळात चातुर्मासामुळे विवाह होत नसतात. चंदा पंचांगात गौण व आपत्कालीन मुहूर्त दिल्याने चातुर्मासासह गुरू, शुक्र अस्त काळातही विवाह होतील. कोरोनामुळे विवाहासाठी नियम व अटी असल्याने धूमधडाक्यात होणारे विवाह साध्या पद्धतीने करावे लागतील. मंगल कार्यालयांनाही केवळ ५० जणांच्या उपस्थितीतच विवाहासाठी परवानगी दिल्याने अडचणी आहेत. विवाह मुहूर्त भरपूर असल्याने लग्नसराईस यंदा ‘ब्रेक’ नाही. 
दर वेळी गुरू, शुक्र अस्त व अन्य काही धार्मिक कारणांमुळे विवाह मुहूर्त दिले जात नसत. यंदा मुख्य कालातीत मुहूर्तासह गौण व आपत्कालीन काळासाठी वेगळे मुहूर्त दिल्याने विवाहेच्छुकांचे मनोरथ पूर्ण होण्यास अडचण नाही. 

‌३० जूनला थांबलेली लग्नसराई शुक्रवारपासून (ता.२७) सुरू झाली. या मुख्य कालानुसार फेब्रुवारीनंतर गुरू, शुक्र अस्त असल्याने मुहूर्त नाहीत. परंतु, या काळात गौण व आपत्कालीन मुहूर्त आहेत. विवाहासाठी मुख्य कालातील मुहूर्तास प्राधान्य द्यावे. अगदीच गरज पडल्यास गौण व आपत्कालीन मुहूर्ताचा विचार करण्याचे आवाहन दाते पंचांगात केले आहे. 
- अरुण राव, पुरोहित, वावडे 

लग्नाचे मुहूर्त 
नोव्हेंबर- २७, ३० 
डिसेंबर- ७, ८, ९, १७, १९, २३, २४, २७ 
जानेवारी- ३, ५, ६, ७, ८, ९, १० 
फेब्रुवारी- १५, १६ 
एप्रिल- २२, २४, २५, २६, २८, २९, ३० 
मे- १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१ 
जून- १६, १९, २०, २६, २७, २८ 
जुलै-१, २, ३, १३ 

गौण व आपत्कालीन मुहूर्त 
नोव्हेंबर- १८, २०, २१, २२ 
जानेवारी- १८, १९, २०, २१, २४, २६, ‌३० 
फेब्रुवारी- १, २, ३, ४, ८, २१, २२, २६, २७, २८ 
मार्च- २, ३, ५, ७, ९, १०, १५, १६, ३० 
एप्रिल-१, ५, ६, ७ 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com