esakal | अमळनेरला कारमधून ४० किलो गांजा पोलिसांनी पकडला
sakal

बोलून बातमी शोधा

crime

अमळनेरला कारमधून ४० किलो गांजा पोलिसांनी पकडला

sakal_logo
By
टीम ई सकाळअमळनेर : धरणगाव- सावखेडा रस्त्यावर कारमधून (car) ४० किलो गांजा (cannabis) घेऊन जाणाऱ्या एरंडोल येथील संशयितांना पोलिसांनी (Amalner Police ) मुद्देमालासह ताब्यात घेतले. ही धडक कारवाई सोमवारी (ता. १२) रात्री केली.(amalner police Forty kilos of cannabis were found in the car)

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी हिंदू असून वारकऱ्यांची परंपरा खंडीत केली


गांजाची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी आपल्यासोबत सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, पोलिस कर्मचारी किशोर पाटील, मिलिंद भामरे, मधुकर पाटील यांना घेऊन सोमवारी (ता. १२) रात्री नऊच्या सुमारास सावखेडा शिवारात सापळा रचला. त्यांना चोपडा- धरणगाव रस्त्यावर हॉटेल इंद्रायणीजवळ दुचाकीने (एमएच १९, बीसी ५७३०) येणाऱ्या व्यक्तींची हालचाल संशास्पद वाटली. त्याला ताब्यात घेतले असता, त्याने त्याचे नाव सतीश चौधरी असे सांगितले. त्याच्यावर संशय बळावल्याने त्याचा मोबाईल जप्त करून घेतला. त्यानंतर लगेच त्याच्या मागे काही वेळाने नऊच्या दरम्यान पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार (एमएच ०१, बीटी ५०९) आली. तिला अडवून तपासणी केली असता, त्यात ३९ किलो ५०० ग्रॅमची गांज्याची २० पाकिटे डिक्कीत आढळून आली. चालक आकाश रमेश इंगळे (रा. मरिमातानगर, एरंडोल) व त्याच्यासोबत कासोदा येथील इस्लामपुरा भागातील शकिल खान अय्यूब खान यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून खडसेंवरील ईडी कारवाईचा निषेध


पोलिस निरीक्षक हिरे यांनी तत्काळ पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव व तहसीलदार मिलिंद वाघ यांच्याशी संपर्क साधून शासकीय पंच मागवून पंचनामा केला. गांजाची किंमत सहा लाख असून, चार लाखांची कार व ५० हजारांची दुचाकी, असा एकूण दहा लाख ५० हजार रुपयांचा माल जप्त करून तिघा संशयितांना अटक केली आहे. याबाबत मिलिंद भामरे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे तपास करीत आहेत.


आणखी संशयितांचा शोध
संशयिताना मंगळवारी (ता. १३) दुपारी बाराला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघांना शनिवार (ता. १७)पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपासात अमळनेरमधील काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे.

loading image