सुखी राजकारणाची बांधुनिया गाठ..पाऊले चालती 'विकास'रुपी पंढरीची वाट

राजकारणात नेहमीच राजकीय व्यक्ती एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत असतात.
सुखी राजकारणाची बांधुनिया गाठ..पाऊले चालती 'विकास'रुपी पंढरीची वाट

अमळनेर: "सुखी संसाराची बांधुनिया गाठ... पाऊले चालती पंढरीची वाट..." या अभंगाचा आदर्श घेत येथील आजी-माजी आमदारांनी (MLA) सर्व मतभेद-मनभेद विसरून रविवारी झालेल्या कार्यक्रमात (Program) एकाच व्यासपीठावर एकत्र आले. जणू काही हा "राजकीय एकोपा" हा अमळनेर च्या उज्वल भविष्याची नांदी तर ठरणार नाही ना? याचा सुखद अनुभव या कार्यक्रमात दिसून आला. "सुखी राजकारणाची (Political) बांधुनिया गाठ... पाऊले चालती 'विकास'रुपी पंढरीची वाट..." या आधुनिक अभंग ओवी चा प्रत्यय अमळनेरकराना आला.

सुखी राजकारणाची बांधुनिया गाठ..पाऊले चालती 'विकास'रुपी पंढरीची वाट
शिरपूरच्या प्रा.पाटील यांनी शोधला पळसाच्या फुलातील उपकारक जीवाणू

राजकारणात नेहमीच राजकीय व्यक्ती एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत असतात. त्यामुळे कळत नकळत त्यांच्यामध्ये राजकीय वैमनस्य वाढत जाते त्याचाच नकारात्मक परिणाम अनेक विकास कामांमध्ये ही होताना दिसतो. परिणामी हे लोकप्रतिनिधी एकमेकांशी बोलणे तर दूरच मात्र एकमेकांकडे बघणे ही टाळतात, असे चित्र सर्वदूर दिसत असले तरी याची उलट परिस्थिती अमळनेरच्या राजकारणात दिसून आली. आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार डॉ. बी एस पाटील, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ या आजी माजी आमदारांसह नगराध्यक्षा पुष्पलताताई पाटील यांनी या सर्व गोष्टींना तिलांजली देत एकाच व्यासपीठावर आले. हे बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या. शहरासह तालुक्यात या घटनेची दिवसभर खमंग चर्चा होताना दिसून आली. नेहमीच राजकीय कोपरखळ्या मारणारे हे लोकप्रतिनिधी या कार्यक्रमात एकमेकांवर स्तुती सुमने उधळताना दिसली.

दोघांचे 'राज'कीय मार्गदर्शक साहेबराव दादा

सद्यस्थितीत नगरपालिका ही साहेबराव पाटील यांच्या ताब्यात आहे. त्यांच्या धर्मपत्नी पुष्पलताताई पाटील या नगराध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. पालिकेच्या विकास कामात आमदार अनिल पाटील यांची मदत तर होतच असली तरी पालिकेत विरोधी पक्षात असलेले शिरीष चौधरी हे ही विकास कामात आडकाठी आणताना दिसून येत नाही. याची प्रत्यक्ष अनुभूती रविवारी झालेल्या कार्यक्रमात दिसून आली. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या भाषणात माजी आमदार साहेबराव पाटील हे आमचे ('राज'कीय) मार्गदर्शक आहेत हे ऐकल्यावर श्रोत्यांमध्ये भुवया उंचावल्या, अन सर्वांनी टाळ्यांचा गजर करत हास्याची साथ दिली. हाच धागा पकडत आमदार अनिल भाईदास पाटील यांनीही आपल्या भाषणात साहेबराव दादा हे माझेही ('राज'कीय) 'मार्गदर्शक' आहेत अशी विनोदात्मक कोटी केल्यावर श्रोत्यांमध्ये हास्याचे फवारे पसरले.

दोन्ही माजी आमदारांनी दिला एकमेकांना 'नारळ'

"नारळ देणे" याचा शाब्दिक अर्थ निरोप देणे असा होतो. मात्र एखाद्याचा सत्कार करताना नारळ (श्रीफळ) देण्याची प्रथा आहे. हीच बाब ओळखून माजी आमदार डॉ. बी एस पाटील यांनी आपल्या भाषणाला सुरू करण्यापूर्वी माजी आमदार साहेबराव पाटील यांना 'विनोदाचे बादशाह' अशी उपाधी देऊन बहुमान केला. भाषणाला थोडा अल्पविराम देऊन दोन्ही माजी आमदारांनी एकमेकांना नारळ देत स्वागत केले. नेमका हा सत्कार स्वागताचा होता की, एकमेकांना निरोपाचा होता? हा प्रश्न अनुत्तरित राहिला असला तरी उपस्थितांचे काही वेळ मनोरंजन झाले. दरम्यान एकीकडे जिल्हा बँकेची निवडणूक तापली असताना भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांच्यासह सर्वच माजी आमदारांशी गप्पा केल्या.

सुखी राजकारणाची बांधुनिया गाठ..पाऊले चालती 'विकास'रुपी पंढरीची वाट
धुळे जिल्हा बँक निवडणूक: दहा जागांसाठी वीस उमेदवारांमध्ये लढत

प्रथमच आले एकाच व्यासपीठावर

अमळनेरच्या कोणत्याच शैक्षणिक कार्यक्रमात सर्व आजी- माजी आमदार कधीही एकत्र आले नव्हते मात्र पहिल्यांदाच विद्यमान आमदार, विद्यमान नगराध्यक्षासह चार माजी आमदाराना एकत्र आणण्याचे कौशल्य उत्कर्ष खानदेशी अधिकारी मंडळ, शिवशाही फाउंडेशन व विविध विकास मंचच्या आयोजकांनी घडवून आणले. हे सर्व एकाच व्यासपीठावर येऊच शकत नाही अशी काहीशी चर्चा कार्यक्रमापूर्वी सुरू होती मात्र सर्वच माजी माजी आमदारांनी एकत्र येत आपल्या अनोख्या राजकीय मैत्रीचे रूप या शैक्षणिक कार्यक्रमात दाखवून दिली. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील युवावर्गाला प्रशासनातील सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचवण्याचा मानस या सर्वांच्या भाषणातून व्यक्त झाला. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून राजकीय व्यक्तीने ही एकत्र येऊन काम केले पाहिजे तसेच ज्येष्ठ विधी तज्ञ पद्मश्री ऍड उज्वल निकम यांच्या हस्ते युवा अधिकाऱ्यांचा सत्कारातून अनेक विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळाली, पर्यायाने या कार्यक्रमाचा उद्देश सफल झाल्याचे दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com