लाखोंचा खर्च तरीही कामे अपूर्ण; तालुका क्रीडासंकुलाचा प्रश्‍न 

mla anil patil
mla anil patil

अमळनेर : नव्वद लाख खर्च करूनही क्रीडासंकुलाचा उपयोग होत नाही, ठरल्याप्रमाणे सुविधा झालेल्या नाहीत. त्यामुळे क्रीडासंकुलाचा ट्रॅक सुनियोजित करून द्या आणि इनडोअर हॉलची तात्पुरती डागडुजी करून खेळाडूंना उपयुक्त करा, खेळाडू मैदानापासून वंचित राहून त्यांच्या करिअरचे नुकसान व्हायला नको, अशा सक्त सूचना आमदार अनिल पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शुक्रवारी (ता. ९) तालुका क्रीडासंकुलाची आढावा बैठक सकाळी अकराला खानदेश शिक्षण मंडळाच्या सभागृहात झाली होती. 
विधानसभा निवडणुकीनंतर पहिलीच आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीपूर्वी आमदारांसह अधिकाऱ्यांनी क्रीडासंकुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. तालुका क्रीडासंकुलासाठी संरक्षण भिंत, चारशे मीटर ट्रॅक, इनडोअर हॉल या कामात ९० लाख रुपये खर्च झाले आहेत, मात्र एकही काम पूर्ण झालेले नाही. धावन मार्ग चुकीचा बनविलेला आहे. त्याच्या विटा बाहेर निघालेल्या आहेत. हॉलदेखील अपूर्णावस्थेत असून, दारे खिडक्या, कंपाउंडच्या जाळ्यादेखील चोरीला गेल्या आहेत. अंदाजपत्रकाप्रमाणे एक-एक बाब पूर्ण करून त्याचा ताबा जिल्हा क्रीडा विभागाकडे द्यायला पाहिजे होता. प्रत्येक बाबनिहाय खर्च देण्यात आलेला नाही. अर्धवट वस्तू व बांधकाम यांचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे, असे तालुका क्रीडा अधिकारी सुजाता गुलाने यांनी आढावा सादर करताना सांगितले. 
या बैठकीस खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश मुंदडा, डॉ. संदेश गुजराथी, तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड, गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हेमंत महाजन, पोलिस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, राजेंद्र चव्हाण, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चंद्रकांत देसले, तालुका क्रीडा समिती सदस्य सुनील वाघ, संजय पाटील, नीलेश विसपुते, संजय चौधरी, संदीप पाटील, सुनील गरुडकर, आर. एस. पाटील हजर होते. 
 
सर्वच कामे अपूर्ण 
जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी सांगितले, की धावन मार्ग, खो-खो मैदान, बास्केट बॉल मैदान, कबड्डी मैदानासाठी ३० लाख खर्चाची तरतूद असतानाही ३० लाखांत फक्त धावन मार्ग करण्यात आला आणि तोही चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे त्याचा ताबा घेऊ शकत नाहीत. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. यामुळे खेळाडूंना वंचित राहावे लागत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावर आमदार अनिल पाटील यांनी ताबडतोब ट्रॅक दुरुस्त करण्याची व्यवस्था करून हॉलच्या बांधकामासाठी लागणारा अपूर्ण निधी मिळवून देतो तोपर्यंत हॉलदेखील वापरण्यायोग्य करा, अशा सूचना दिल्या. 
 
आराखड्यास मंजुरीसाठी टाळाटाळ 
क्रीडासंकुलाचा वाढीव खर्च व अर्धवट बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने नऊ कोटी १५ लाख ७६ हजार रुपयांचे अंदाजपत्रक व आराखडा क्रीडा व युवक सेवा संचालनालयास सादर करण्यात आला आहे, त्यास अद्याप मंजुरी देण्यात आली नाही. तर, खेलो इंडिया क्रीडा विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रम स्पोर्टस इन्फ्रास्ट्रक्चरअंतर्गत बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी दहा कोटी रुपये अनुदान मंजुरीकरिता प्रस्ताव पाठविण्यासाठी तालुका क्रीडा समितीचा ठराव करण्यात आला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com