esakal | अरे व्वा..कोरोना काळात बिनविरोध ग्रामपंचायतींना लागली लॉटरी !
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat

अरे व्वा..कोरोना काळात बिनविरोध ग्रामपंचायतींना लागली लॉटरी !

sakal_logo
By
उमेश काटे

अमळनेर : अगोदरच प्रशासन कोरोना या महामारीत लढण्यासाठी व्यस्त होता, त्यामुळे प्रशासनावर ताण येऊ नये, निवडणूक खर्चाची बचत व्हावी तसेच गावातील एकोपा ही टिकून राहावा या उद्देशाने आमदार अनिल भाईदास पाटील यांनी बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींना 25 लाख रुपयांचा निधी देण्याची संकल्पना आणली होती. या पार्श्वभूमीवर अमळनेर मतदार संघातील अनेक गावांना कोरोना काळात लॉटरी लागली असून 2515 अंतर्गत निधी उपलब्ध करून दिल्यामुळे गावांमध्ये विकासकामे होणार आहेत. विशेष म्हणजे निवडणूकीची रणधुमाळी कमी केल्यामुळे कोरोना संक्रमण ही कमीया निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

हेही वाचा: हनुमानाची मुर्ती चक्‍क लोण्याची..उन्हाळ्यातही नाही वितळत मुर्तीवरील लोणी

'गाव करी ते राव काय करी?" या म्हणीचा प्रत्यक्ष प्रत्यय तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला. काही ठिकाणी गावकऱ्यांनी एकत्र येत मतदार संघातील काही ग्रामपंचायती बिनविरोध केल्या होत्या. 'ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि विकास कामांसाठी 25 लाखांचा निधी मिळवा" या आमदार अनिल पाटलांच्या खुल्या ऑफरला अनेक गावांनी प्रतिसाद देत निवडणूक बिनविरोध केली होती. आमदारांनी देखील त्याची दखल घेत अल्पवधीतच यातील असंख्य गावांना विकास कामांसाठी निधीची तरतूद करून आपली शब्दपूर्ती केली आहे. अल्पावधीतच आमदारांनी शब्दाची पूर्ती केल्याने संबधित गावांचे सरपंच,उपसरपंच, ग्रा प सदस्य आणि ग्रामस्थांनी आमदारांचे आभार व्यक्त केले आहेत.

या गावांना मिळाला निधी

अमळनेर तालुका- देवळी शुद्ब पाणी प्लांट- 7लाख, देवळी स्मशानभूमी व सांत्वन शेड बांधकाम- 8 लाख, कलाली विठ्ठल मंदिर बांधकाम- 15 लाख, फाफोरे येथे पेव्हरब्लॉक चौक सुशोभीकरण 15 लाख,जळोद सभामंडप बांधकाम- 15 लाख, दापोरी गावदरवाजा- 7 लाख, दापोरी शुद्ब पाणी प्लांट- 5 लाख, दापोरी चौक सुशोभीकरण -3 लाख, टाकरखेडा रस्ता काँक्रीटीकरण- 15 लाख, पिंपळे बु सभामंडप बांधकाम- 15 लाख, एकतास संरक्षण भिंत-15 लाख रुपये, एकरुखी पाईप मोरी बांधकाम -25 लाख, कुर्हे बु सब स्टेशन ते स्मशान भूमी पर्यंत काँक्रिटीकरण रस्ता- 15 लाख ,

हेही वाचा: गोव्यात सुट्टी एन्जाॅय करताय ! या मंदिरांना आवश्य भट द्या

पारोळा तालुका-

महाळपुर स्मशानभूमी पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण -15 लाख, भोलाने स्मशानभूमी पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण - 15 लाख, येथे रस्ता कॉंक्रिटीकरण लाख, दळवेल रस्ता काँक्रीटीकरण -15 लाख, वसंतनगर तांडा रस्ता काँक्रीटीकरण -10 लाख, वसंतनगर तांडा स्मशानभूमी सांत्वन शेड- 5 लाख, इंधवे पेव्हरब्लॉक व चौक सुशोभीकरण -20 लाख, जीराळी संरक्षण भिंत- 10 लाख, आदी कामे मंजूर झाली असून लवकरच ही कामे सुरू होणार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुका टाळाव्यात, सर्व सदस्य बिनविरोध निवडले जावेत यासाठी आमदारांनी हे आवाहन करत सर्व गावांना विकास कामांची एक खुली ऑफरच दिली होती,त्यानुसार बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतिना लेखशीर्ष 2515 अंतर्गत निधी उपलब्ध केला आहे. या गावांना लोकहिताची विकासकामे मंजूर झाली आहेत.ज्यां गावांनी लागलीच कामांची मागणी करून प्रस्ताव सादर केला त्या गावांना कामे मंजूर झाली असून उर्वरित गावांना देखील मागणीनुसार लवकरच कामे मंजूर होतील.

अनिल पाटील, आमदार अमळनेर

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image