जळगाव जिल्ह्यात १५ हमीभाव खरेदी केंद्रांना प्रारंभ 

सुधाकर पाटील  | Tuesday, 8 December 2020

शासनाने नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रब्बी हंगामात तब्बल १६ हजार शेतकऱ्यांचा मका मोजला गेला नाही.

भडगाव : जळगाव जिल्ह्यात १७ पैकी १५ हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. त्यातून आतापर्यंत २४ हजार ४१३ क्विंटल मका, तर सहा हजार ४३४ क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली आहे. ऐरवी केंद्राचे फक्त उद्‌घाटन करण्यात येत. मात्र कधी बारदान, तर कधी गुदाम नसल्याचे कारण पुढे करत केंद्र उशिराने सुरू व्हायचे; पण यंदा तब्बल १५ केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांसाठी सुखावह बाब आहे. 

साडेचार महिन्यांत ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्णत्वाचे आव्हान 

जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामात हमीभाव केंद्राच्या माध्यमातून शासनाने विक्रमी मका व ज्वारी खरेदीनंतर खरिपातही शेतकरी मोठ्या प्रमाणात सरसावले आहेत. मात्र रब्बी हंगामापेक्षा खरिपात शेतकऱ्यांची नोंदणी कमी दिसून येत आहे. भुसावळ व पाचोरा येथील केंद्र गुदाम उपलब्ध नसल्याने अद्याप सुरू होऊ शकले नाही. विशेष म्हणजे, ज्या केंद्रावर धान्य खरेदीसाठी बारदान नाही तेथे शेतकऱ्यांकडून बारदान घेण्यात येत आहे. त्या शेतकऱ्यांना शासकीय दरानुसार बारदान मूल्य देण्यात येणार आहे. त्यामुळे बारदानअभावी धान्य खरेदी थांबणार नाही, ही समाधानाची बाब आहे. 
जळगाव जिल्ह्यात हमीभावाने धान्य खरेदीसाठी प्रशासनाकडून १७ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत १५ केंद्र सुरू झाली आहेत. या १५ केंद्रावर आजपर्यंत ४८४ शेतकऱ्यांचा २४ हजार ४१३ क्विंटल मका, २७९ शेतकऱ्यांची सहा हजार ४३४ क्विंटल ज्वारी, तर १९ शेतकऱ्यांकडून २४२ क्विटंल बाजरी खरेदी करण्यात आल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी. एन. मगरे यांनी सांगितले. 

Advertising
Advertising

८,४७७ शेतकऱ्यांची नोंदणी 
रब्बी हंगामात पहिल्यांदा शासनाकडून ज्वारी व मका खरेदी करण्यात आली होती. रब्बी जळगाव जिल्ह्यात २० हजार ४२६ शेतकऱ्यांनी मका खरेदीसाठी नोंदणी केली होती. मात्र खरीप हंगामात मका खरेदीसाठी चार हजार ६३५, ज्वारीसाठी तीन हजार ३६७, तर बाजरीसाठी ४७५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शासनाने नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रब्बी हंगामात तब्बल १६ हजार शेतकऱ्यांचा मका मोजला गेला नाही. तसे आता होऊ नये, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

...तर कवडीमोल भावात विक्री झालेले धान्य 
खरीप हंगाम संपून रब्बी हंगामाची पेरणी होऊन गेली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ज्वारी, मका विक्री केला आहे. मक्याचा हमीभाव हा १,८५० रुपये प्रतिक्विंटल आहे. मात्र बाजारात ९००-१००० रुपये प्रतिक्विंटल रुपये दराने शेतकऱ्यांना विक्री करावा लागला. ७०-८० टक्के शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावात विक्री झाला आहे. हे खरेदीसाठी झालेल्या तोकड्या नोंदणीवरून दिसून येते. जळगाव जिल्ह्यात खरिपात ८२ हजार ५८३ हेक्टर मक्याची, तर ३७ हजार ८८० हेक्टरवर ज्वारीची लागवड करण्यात आली होती. 

वाचा- नरडण्यातील तीन खुनांची उकल होणार ? की.. -

डिस्को ज्वारीचा प्रश्‍न गंभीर 
परतीच्या पावसाने ज्वारी पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे ज्वारी डिस्को (पाणी लागून काळसर पडणे) झाली आहे. त्यामुळे खासगी बाजारात ही ज्वारी १,२००-१,५०० रुपये दरा