आयकर भरणारे शेतकऱ्यांनी घेतला किसान योजनेचा लाभ; त्‍यांना बसला झटका

PM Kisan scheme
PM Kisan scheme

भडगाव (जळगाव) : प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचे लाभ नोकरदार व आयकर भरणाऱ्या व्यक्तींनी घेऊ नये असे शासनाचे आदेश असतांनाही भडगाव तालुक्यात नोकरदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. तालुक्यातील एकुण 713 व्यक्तींना आयकर विभागाच्या सुचनेनंतर तहसिलदार माधुरी आंधळे यांनी नोटीसा बजावल्या आहेत. 

केद्र शासनाने शेतकर्यासाठी पंतप्रधान कीसान सन्मान योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत शेतकर्याना दर चार महीन्यांनी दोन हजार रूपये म्हणजे वर्षाला सहा रूपये अनुदान देण्यात येते. यात जे शेतकरी नौकरदार आहेत वा आयकर भरणारे आहेत. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र तरीही अशा शेतकर्यानी या योजनेचा लाभ घेतला आहे. 

67 लाखाची होणार वसूली
भडगाव तालुक्यातील आयकर भरणार्या 713 शेतकर्याकडुन तब्बल 67 लाख 68 हजाराची वसुली करण्यात येणार आहे. त्याबाबत त्यांना आयकर विभागाच्या सुचनेनुसार रकमा भरण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या असल्याचे तहसील कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले. संबंधितांनी नोटीसा मिळाल्याच्या 15 दिवसाच्या आत रक्कम भडगाव तहसिल कार्यालयात भराव्यात असे नोटीशीत नमुद आहे. 

शासन आदेशाकडे दूर्लक्ष 
जे शेतकरी आयकर भरतात अशा शेतकर्याना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये असे शासनाचे स्पष्ट आदेश असतांना पडताळणी तालुक्यातील 713 शेतकर्यानी शासनाचे आदेश झुगारून पंतप्रधान कीसान सन्मान योजनेचा लाभ घेतल्याचे लक्षात आले आहे. त्यादृष्टीने महसुल प्रशासन कामाला लागले आहे. शासनाकडे आयकर भरणा-या व्यक्तींची आॅनलाईन माहितीत आयकर भरणारे शेतकरी बरेचशे आहेत हे आयकर विभागाला हे लक्षात आले आहे. आयकर विभागाच्या सुचनेनंतर तहसिलदार माधुरी आंधळे यांनी वसुलीच्या कारवाईला सुरवात केली आहे. 

....तर होणार कारवाई 
पडताळणी केल्यानंतर तालुक्यातील 713 शेतकरी हे कर भरत असल्याचे निर्दशनास आल्यानंतर त्यांना 15 दिवसात पैसै भरण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पी.एम.कीसान या नावाने धनादेशाव्दारे ही रक्कम भरायची आहे. जे शेतकरी 15 दिवसाच्या आत पैसे भरणार नाहीत त्यांच्यावर महाराष्टृ जमिन महसुल संहिता 1966 मधील सक्तीच्या वसुली संदर्भातील तरतुदी व नियमांचा उपयोग करुन वसुलीची कार्यवाही करण्यात येईल. तसेच देय रकमांच्या वसुलीकरीता इतर कायदयानुसार देखील कार्यवाही करण्यात येईल. या नोटीसवर तहसिलदार माधुरी आंधळे यांची सही आहे. अशी माहिती नायब तहसिलदार गजानन भालेराव, लिपिक दिपाली राजपुत यांनी दिली.
 
ज्या शेतकर्याना रक्कम भरण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांनी मुदतीत पैसे भरावेत अन्यथा त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. त्यामुळे शेतकर्यानी कार्यालयात येऊन धनादेशाव्दारे पैसे जमा करावेत.
-माधुरी आंधळे तहसीलदार भडगाव 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com