जळगाव जिल्ह्यात ज्वारी-मका खरेदी अपूर्ण ; मुदवाढीसाठी सचिवांना पत्र

जळगाव जिल्ह्यात ज्वारी-मका खरेदी अपूर्ण ; मुदवाढीसाठी सचिवांना पत्र

भडगाव  ः शासनाने ज्वारी व मका खरेदीसाठी दिलेली मुदतवाढ १५ जुलैला संपत आहे. मात्र जिल्ह्यातील मका खरेदीसाठी नोंदणी केलेल्या १६ हजार ५३४, तर ज्वारीचे दोन हजार १६९ शेतकऱ्यांचा माल अद्याप खरेदी होणे बाकी आहे. त्यात दहा लाख क्विंटल मका, तर ५० हजार क्विंटल ज्वारीची खरेदी अपेक्षित आहे. त्यामुळे शासनाने हा माल खरेदी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्याअनुशंगाने मंगळवारी (ता. १४) जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ही अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक विभागाच्या सचिवांना मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली आहे. 


शासनाने पहिल्यांदा रब्बी हंगामातील ज्वारी व मका खरेदीसाठी परवानगी दिली. त्यानुसार सुरवातीला ३० जुनपर्यंत अडीच लाख क्विंटल मका, तर दीड लाख क्विंटल ज्वारी खरेदीसाठी परवानगी दिली होती. मात्र त्यानंतरही मोठ्या प्रमाणात ज्वारी व मका खरेदी करायचा राहिल्याने १५ जुलैपर्यंत या केंद्रांना मुदतवाढ देण्यात आली. याशिवाय अडीच लाख क्विंटलवरून नऊ लाख क्विंटल मका खरेदीसाठी परवानगी देण्यात आली. मात्र मुदतवाढीची परवानगी संपत असल्याने हजारो शेतकऱ्यांचा माल खरेदीअभावी पडून आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर मका खरेदीसाठी १९ हजार ४६१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ दोन हजार ९२७ शेतकऱ्यांकडून एक लाख ८९ हजार ४३९ क्विंटल मका खरेदी राहिला आहे. तब्बल १६ हजार ५३४ शेतकऱ्यांचा माल खरेदीच्या प्रतीक्षेत आहे. ज्वारी खरेदीसाठी तीन हजार ८७३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक हजार ७०४ शेतकऱ्यांकडून ४४ हजार ४६४ क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली. त्यामुळे दोन हजार १६१ शेतकऱ्यांचा माल अद्याप शिल्लक आहे. 


ज्वारी व मका खरेदी दृष्टिक्षेपात 
- मका खरेदी एकूण नोंदणी - १९,४६१ 
- ज्वारी खरेदी एकूण नोंदणी - ३, ८७३ 
- आतापर्यंत मका खरेदी (क्विटंलमधे) - १,८९,४३९ 
- आतापर्यंत ज्वारी खरेदी - ४४,६६४ 
- मका खरेदीचे शिल्लक राहिलेले शेतकरी - १६,५३४ 
- ज्वारी खरेदीचे शिल्लक शेतकरी - २,१६९ 
- शिल्लक मका - दहा लाख क्विंटल 
- शिल्लक ज्वारी - ५० हजार क्विंटल 
संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com