साठवून ठेवलेली वाळू चोरीचा नवा फंडा उघड

valu chori
valu chori

भडगाव (जळगाव) : शहरातील पाचोरा रस्त्यावरील दादाजी ढाब्याच्या मागे (ता.20) ला सकाळी सात वाजता वाळू साठवलेल्या थप्प्यावरून जेसीबीच्या साहाय्याने डंपर व ट्रॅक्टरमध्ये वाळू भरतांना महसूल विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. त्यांच्यावर काल रात्री उशीरा भडगाव तहसीलदार माधुरी आंधळे यांच्या तक्रारीवरून वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे वाळू चोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. 

भडगाव शहरातील पाचोरा रोडवरील दादाजी धाब्याच्या मागील भागात वाळू साठ्यावरून जेसीबीच्या साहाय्याने वाळू भरतांना भडगाव व पाचोरा महसूल विभागाच्या पथकाने डंपर (एमएच 19 सीवाय 5426), जेसीबी (एमएच 19 सिजे 0944) व विना क्रमांक ट्रॅक्टर रंगेहाथ पकडले होते. त्यांच्यावर काल (ता. २१) भडगाव तहसीलदार माधुरी आंधळे यांच्या तक्रारीवरून डंपर चालक प्रदीप साळुंखे, ट्रॅक्टर चालक  रवींद्र मोरे, जेसीबी चालक योगेश पाटील, डंपर व जेसीबी मालक अविनाश अहिरे, ट्रॅक्टर मालक सम्राट वाघ (सर्व रा. टोणगाव ता. भडगाव) यांच्या विरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ किरण ब्राम्हणे करत आहेत. दरम्यान महसूल विभागाच्या कार्यवाहीत घटनास्थळी जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर, 7 ब्रास वाळू असा 60 लाख 26 हजार, 915 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. ही कारवाई तहसीलदार माधुरी आंधळे, वाहन चालक विष्णू तायडे, पाचोरा तलाठी कैलास बहीर, आर. डी. पाटील, मयुर आगरकर, दीपक दवंगे यांच्या पथकाने केली.
 
तिहेरी कारवाईने वाळूचोरीच्या मुसक्या आवळल्या
वाळू चोरी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने 144 कलम लागू केली आहे. वाळू चोरी करतांना वाहन सापडल्यास त्यावर महसूल प्रशासनाकडुन दंडात्मक करण्यात येईल. तर पोलिस स्टेशन ला वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येतो. शिवाय 'ते' वाहन आरटीओ कडे कारवाईसाठी पाठविण्यात येते. त्यामुळे वाळूचोराच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या गेल्या आहेत. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार माधुरी आंधळे यांच्या नेतृत्वाखाली पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे वाळूचोरांचे धाबे दणाणले आहे. 
 
वाळू चोरांची कुठल्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. अवैधरित्या वाळू चोरी करतांना आढळल्यास त्यांच्यावर तिहेरी कारवाई करण्यात येईल.त्यामुळे कोणीही अवैध वाळू उपसा करू नये.
-माधुरी आंधळे तहसीलदार भडगाव 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com