मालवाहतुकीसाठी विशेष पार्सल रेल्वेगाड्यांना मुदतवाढ 

railway parcel
railway parcel

भुसावळ : मालवाहतुकीसाठी विशेष पार्सल रेल्वेगाड्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ००११३ डाउन पार्सल विशेष गाडी सीएसटी येथून रोज रात्री पावणेदोनला सुटेल आणि तिसऱ्या दिवशी साडेअकराला शालिमारला पोचेल. ००११४ गाडी रोज रात्री पावणेदहाला शालिमार येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सीएसटीला सकाळी पावणेदहाला पोचेल. ००९१३ डाउन पोरबंदर-शालिमार गाडी पोरबंदरहून सकाळी आठला सुटेल. तिसऱ्या दिवशी मध्यरात्री साडेतीनला शालिमारला पोचेल. ००९१४ अप शालिमार-पोरबंदर गाडी शालिमारहून रात्री दहा वाजून ५० मिनिटांनी सुटेल. तिसऱ्या दिवशी सायंकाळी सहाला पोरबंदरला पोचेल. ००७६३ डाउन हैदराबाद- अमृतसर गाडी हैदराबादहून शुक्रवारी रात्री साडेसातला सुटेल. रविवारी अमृतसरला सकाळी ९.१० ला पोचेल. ००७६४ अप अमृतसर- हैदराबाद गाडी अमृतसरहून सोमवारी पाचला सुटेल. मंगळवारी हैदराबादला सायंकाळी ६.२० ला पोचेल. 
देशात आता अनलॉक जाहीर झाल्याने उद्योगधंदे, बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी मालाची मागणी होत असून, भुसावळ रेल्वे मंडलाने जूनमध्ये चार लाख ८२ हजार टन मालवाहतूक केली आहे. जूनमध्ये १८३ रेकद्वारे आठ हजार ७०९ वॅगनमध्ये हे लोडिंग विविध स्थानकांवरून झाले. 
भुसावळ मंडलातून २८ रेकद्वारे एक हजार १८३ वॅगनमध्ये कांदा विविध ठिकाणी पाठविण्यात आला. त्यात १७ रेक बांगलादेशला पाठविले आहेत. इतर रेक पेट्रोलियम पदार्थ, डी-कोक ऑइल, सिमेंट, खते व अन्य वस्तूंची वाहतूक रेल्वेने केली आहे. भुसावल मंडळ रेल्वे प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांच्या नेतृत्वात वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक आर. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मालवाहतूक करण्यासाठी विशेष सोयी-सुविधा पुरवीत वाणिज्य विभागाने एक मोठी कामगिरी केली आहे. ऑनलाइन बैठकीद्वारे व्यापारी, उद्योगपती, चेंबर्स ऑफ कॉमर्स, एमआयडीसी आदी असोसिएशनच्या सदस्यांसोबत संवाद साधून त्यांना मध्य रेल्वेद्वारा करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली जात आहे. मध्य रेल्वेच्या, भुसावळ विभागातून दररोज लोडिंग, अनलोडिंगसाठी विविध टर्मिनल्सवर रेक (मालगाड्या) हाताळल्या जात आहेत. विविध गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांमधील मध्य रेल्वेचे कर्मचारी मालगाडी सुरक्षित आणि सुरळीत चालविण्यासाठी कार्यरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com