special railway
special railway

रेल्वे प्रवाशांसाठी चार ‘उत्सव ट्रेन’ 

भुसावळ (जळगाव) : आगामी सण-उत्सवांच्या दिवसांमुळे रेल्वेगाड्यांना होत असलेली गर्दी पाहता गोरखपूर व मडगावदरम्यान उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. 

लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर सुपर फास्ट ट्रेन 
डाउन ०२१६५ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर सुपर फास्ट गाडी २२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान गुरुवारी व सोमवारी स्थानकावरून ५.२३ ला सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ ला गोरखपूर स्टेशनला पोचेल. अप ०२१६६ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल्स सुपरफास्ट विशेष गाडी २३ ऑक्टोबर ते १ डिसेंबरदरम्यान दर शुक्रवारी व मंगळवारी स्थानकावरून ३.४५ ला सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० ला लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनला पोचेल. या गाडीला नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, जंघई, भदोयी, वाराणसी, महू, देवरिया आदी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. दरम्यान, आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. शिवाय प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान कोरोना नियमांचे प्रवाशांना पालन करावे लागणार आहे. 

नागपूर-मडगाव विशेष गाडी 
अप ०१२३५ नागपूर-मडगाव विशेष गाडी २३ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान दर शुक्रवारी स्टेशनहून चारला सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी ४.४० ला मडगावला पोचणार आहे. डाउन ०१२३६ मडगाव-नागपूर विशेष गाडी २४ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान दर शनिवारी स्थानकावरून ७.४० ला सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी ८.३० ला नागपूर रेल्वेस्थानकावर पोचेल. या गाडीला बडनेरा, अकोला, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कनकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवम, करमाली रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात आला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com