भुसावळात कब्रस्थानात गोळीबार; सात जणांविरुद्ध गुन्हा

shooting
shooting

भुसावळ (जळगाव) : शहरातील आरपीडी रोडवरील कबरस्थानात किरकोळ कारणावरून 19 वर्षीय तरुणावर गोळी झाडून फायटरने मारहाण झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी रात्री उशिरा सात संशयीताविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी आदित्य संजय लोखंडे (वय १९, न्यू आंबेडकरनगर, भुसावळ) याच्या फिर्यादिवरून, आरोपी चिन्ना (पूर्ण नाव माहिती नाही) याने आदित्यला फोन करून आपल्या घरी बोलावून घेतले. तेव्हा आतिष खरात, हंसराज, गोलू खरात, चिन्ना, सूरज यांनी मारहाण करून मोटरसायकल वर बसवून कबरस्थानात घेऊन गेले. तेथे आतिष खरात, हंसराज, गोलू खरात यांनी गोळीबार केला असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

गोळीबारात आदित्य लोखंडे हा जखमी झाला होता. तर त्यास गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले होते. गोळीबारात गोळी तरुणाच्या कानाला, डोक्ययाला लागली असून तरुणाच्या हातालाही दुखापत झाली आहे. गोळीबाराची माहिती कळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकार्‍यांनी घटनास्थळ गाठले. शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांनी गोदावरी रुग्णालयात जावून जखमींकडून हल्ल्याबाबत माहिती जाणून घेतली. संशयीत आरोपींनी जखमीची दुचाकी तसेच मोबाईलदेखील लांबवला आहे. तपास सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.

संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com