हतनूरचे बत्तीस दरवाजे उघडले

hatnur dam
hatnur dam

भुसावळ : जिल्ह्यातील सिंचन बिगर सिंचनाकरीता महत्वाच्या अशा हतनूर धरणाचे 32 दरवाजे सकाळी सातला अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे.
जिल्ह्यासह मध्यप्रदेशात पावसाने हजेरी लावल्याने तापी-पूर्णा नद्यांमधून धरणात पाण्याची आवक वाढून जलसाठा निर्माण झाला आहे. सर्वाधिक पाण्याचा प्रवाह हा पूर्णा नदीतून येत आहे. तर नदी परिसरात पाऊस सुरुच असल्याने पाण्याची आवकही वाढत आहे. त्यामुळे हतनूर प्रशासनाने धरणाचे 32 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत. धरणातून 32 दरवाजातून 30, 516 क्युसेस प्रतिसेकंद वेगाने पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदी खळाळून वाहू लागली आहे. सद्य:स्थितीत धरणाची जलपातळी 209.910 मीटर आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com