मुसळधार पाऊस; हतनूरचे 36 दरवाजे उघडले... नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !

मुसळधार पाऊस; हतनूरचे 36 दरवाजे उघडले... नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !

भुसावळ  : जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या अशा हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज (ता. 15) दिवसभरात दमदार पाऊस झाल्याने दुपारी एकला हतनूर धरणाचे 36 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आलेले असून, तापी नदी दुथळी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 

धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असून, 30516 क्युसेक्स इतक्या प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तसेच आज (ता. 15) धरणाची जलपातळी 209.480 मीटर पर्यंत पोहचलेली असून धरणात आज रोजी 179.60 दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा शिल्लक आहे. लाॕकडाऊनमुळे यावर्षी रेल्वे, आयुध निर्माणी, दीपनगर वीजनिर्मीती केंद्र हे बंद असल्याने अशा जादा वापर असलेल्या ठिकाणी पाण्याचा वापर न झाल्याने जलसाठा मुबलक प्रमाणात शिल्लक आहे. तसेच भुसावळ, मुक्ताईनगर , बोदवड, यावल, रावेर, या तालुक्यातील 38 हजार हेक्टरवरील शेतीला याचा लाभ होणार असल्याची माहिती हतनूर धरणाचे उपअभियंता पी. एन. महाजन यांनी दिलेली आहे. 

पाल परिसरात  दमदार हजेरी

पाल ता रावेर गेल्या सात ते आठ दिवसा पासून दडी मारलेल्या पावसाने आज सकाळी साडे दहा वाजता दमदार हजेरी लावली आज झालेल्या पावसामुळे सुकी नदीसह परिसरातील नदी नाले खळखळून वाहून निघाले तसेच गेल्या आठवडा भरापासुन पावसाने हुलकावणी दिली होती परंतु आज सकाळी झालेल्या पावसामुळे खरिप हंगामी पिकांना देखील दिलासा मिळालेला आले तसेच सुकी नदी व परिसरातील नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे गारबर्डी सुकी प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होईल  

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com