ऑटोमोबाईल, कृषी आधारित घटकांमुळे मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत वाढ

चेतन चौधरी
Saturday, 5 December 2020

किसान रेल हे अजूनही शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय होत आहे. किसान रेल्वेच्या आतापर्यंत 41 ट्रिपमध्ये 13, 513 टन नाशवंत व इतर वस्तूंची वाहतूक झाली आहे.

भुसावळ : नोव्हेंबर 2020 मध्ये मध्य रेल्वेने 5.65 दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये केलेल्या 5.58 दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत 1.3 टक्के वाढ दिसून आली. नागपूर विभागातून डोलोमाइट, कॉटन हस्क, कॉटन बियाणे, कडबा, तांदूळ आणि फ्लाय ॲश, भुसावळ विभागातील हस्क, पुणे विभागातील अ‍ॅग्रो आधारित पोटाश अशा नवीन मालाची वाहतूक रेल्वेकडे वळविण्यासाठी विभागातील व्यवसाय विकास घटकांनी मार्केटिंग केली आहे.

वाचा- एकनाथ खडसेंच्या पतसंस्थेतील ठेवी ठेविदारांना परत मिळाल्या नाही
 

यावर्षी मध्य रेल्वेकडून ऑटोमोबाईलच्या रेक्सची लोडिंग 155 पर्यंत पोहोचली आहे. विविध टर्मिनल्समधून बांग्लादेशात वाहनांची निर्यात होणारी वाहतूक रेल्वेकडे वळविण्यात यश आले असून, ऑक्टोबर व नोव्हेंबर 30 हून अधिक रेक्सची लोडींग केली गेली. एप्रिल ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत कांद्याच्या 182 रॅक्स लोड केल्या गेल्या जी मागील वर्षभरात केलेल्या लोडींग पेक्षा 25 रेक्स नी जास्त आहे. या 182 रेक्स पैकी 79 रॅक बांगलादेशात पाठविण्यात आले आहेत.

भुसावळ विभागातही वाढ
नोव्हेंबर 2020 मध्ये मुंबई विभागाने 1,252 वॅगन्सची प्रतीदिन अशी सर्वाधिक लोडिंगची नोंद केली आहे. भुसावळ विभागाने ऑक्टोबर 2020 मध्ये एनएमजीची सर्वाधिक 21 गाड्यांची नोंद केली आहे नोव्हेंबर मध्येसुद्धा 21 रॅक्स अशीच ठेवली.

आवश्य वाचा- अरेच्चा : 92 वर्षाचे धनुकाका बनले तरुणांचे 'आयकाँन'

किसान रेल्वेमुळे केळी वाहतुकीस मदत
किसान रेल हे अजूनही शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय होत आहे. किसान रेल्वेच्या आतापर्यंत 41 ट्रिपमध्ये 13, 513 टन नाशवंत व इतर वस्तूंची वाहतूक झाली आहे. जेउर स्टेशन वरून प्रथमच 23 टन केळी भरली गेली. कोविड कालावधीत आतापर्यंत 649 पार्सल गाड्या चालविल्या गेल्या आहेत. भिवंडी, पंढरपूर, सांगोला, बेलवंडी, कोपरगाव, मोडलिंब, जेऊर, लासलगाव, वरुड ऑरेंज सिटी, काटोल, पांढुर्णा, नरखेड आणि कळमेश्वर स्थानकही पार्सल वाहतुकीला आकर्षीत करत आहे.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal increase in central railway freight automobile agriculture