कन्फर्म तिकीट न मिळाल्यास त्याच मार्गावर क्लोन गाडीत कन्फर्म बर्थ

चेतन चौधरी
Saturday, 19 September 2020

'लॉकडाऊनच्या काळात सर्वच रेल्वे गाड्या बंद केल्या होत्या. त्यानंतर १९ जूनपासून देशभरात दोनशे विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. त्यापैकी ३८ गाड्या भुसावळ
विभागातून धावत आहे.

भुसावळ : अनेक रेल्वे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. त्यामुळे रल्वेतर्फे आता क्लोन रेल्वेगाड्यांचा (एकाच मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्या) पर्याय सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना नियमित गाडीने कन्फर्म तिकीट न मिळाल्यास त्याच मार्गावर धावणाऱ्या क्लोन गाडीत प्रवाशांना कन्फर्म बर्थ मिळणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे भुसावळ विभागातून अप व डाऊन मार्गावर आठवडाभरात चार क्लोन गाड्या धावणार आहेत.

'लॉकडाऊनच्या काळात सर्वच रेल्वे गाड्या बंद केल्या होत्या. त्यानंतर १९ जूनपासून देशभरात दोनशे विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. त्यापैकी ३८ गाड्या भुसावळ
विभागातून धावत आहे. त्यात चार क्लोन गाड्यांची भर पडल्याने साळवी भागातून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या आता ४२ होईल. या गाड़ीमध्ये फक्त आरक्षण राहिल, या गाड्यांचा अग्रिम आरक्षण अवधि हा दहा दिवसाचा असेल. 

भुसावल विभागातुन जाणाऱ्या गाड्या...
गाड़ी क्रमांक – ०७३७९ डाउन वास्को दी गामा ते हजरत निजामुद्दीन क्लोन विशेष गाड़ी ही २५ सप्टेंबरपासून पुढील आदेशपर्यंत दर शुक्रवारी 12.30 वाजता रवाना होइल आणि तिसऱ्या दिवशी ४.२० वाजता हजरत निजामुद्दीन स्टेशनला पोहचेल. ही गाडी शनिवारी मनमाड सव्वाआठ, भुसावळ १०.५५ वाजता येईल. यात वातानुकूलित तृतीय श्रेणी बारा कोच, चार कोच शयनयान श्रेणी व्यवस्था आहे.
गाड़ी क्रमांक – ०७३८० अप हजरत निजामुद्दीन ते वास्को दी गामा क्लोन विशेष गाड़ी ही २७ सप्टेंबरपासून पुढील आदेशपर्यंत दर रविवारी दुपारी १ वाजता रवाना होइल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ४.४५ वाजता वास्को दी गामा स्टेशनला पोहचेल. सोमवारी भुसावळ ५.२०, मनमाड ७.४५, पुणे, मिराज, बेलगावी, लोंडा, मडगांव येथे थांबेल. यात वातानुकूलित तृतीय श्रेणी १२ कोच, ४ कोच शयनयान श्रेणी अशी व्यवस्था आहे.

गाड़ी क्रमांक –०६५२३ डाउन यशवंतपुर ते हजरत निजामुद्दीन क्लोन विशेष गाड़ी ही २३ सप्टेंबरपासून पुढील आदेशपर्यंत दर बुधवार, शनिवार रोजी दुपारी १ वाजता रवाना होइल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता हजरत निजामुद्दीन स्टेशनला पोहचेल. ही गाडी गुरुवार, रविवार – मनमाड – १५.१०, भुसावळ – १७.४५ थांबेल. यात वातानुकूलित तृतीय श्रेणी १२ कोच, ४ कोच शयनयान श्रेणी अशी व्यवस्था आहे.
गाड़ी क्रमांक ०६५२४ अप हजरत निजामुद्दीन- यशवंतपुर क्लोन विशेष गाड़ी ही २६ सप्टेंबरपासून पुढील आदेशपर्यंत दर शनिवार, मंगळवारी सकाळी ८.४५ वाजता रवाना होइल आणि तिसऱ्या दिवशी ६.२० वाजता यशवंतपुर स्टेशनला पोहचेल. ही गाडी रविवार, बुधवार  भुसावळ १.०५, मनमाड – ३.४०, पुणे, बेलगावी, धारवार, हुबली, हावेरी, दवांगेरे, अर्सिकेरे, तुमकुरू या स्थानकावर थांबेल.यात वातानुकूलित तृतीय श्रेणी बारा कोच, चार कोच शयनयान श्रेणी व्यवस्था आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal new four clone railway running