प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय; अतिरिक्त सहा गाड्या धावणार

चेतन चौधरी 
Friday, 25 September 2020

प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येईल. तसेच कोरोनामूळे मास्क लावणे, सोशल डिस्टेंस, सॅनिटाझर आदी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

भुसावळ ः रेल्वेत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालविणार आहे. या विशेष गाड्या  पूर्णपणे आरक्षित असतील. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येईल. तसेच कोरोनामूळे मास्क लावणे, सोशल डिस्टेंस, सॅनिटाझर आदी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 

या विशेष गाड्यांमध्ये गाड़ी क्रमांक – 05064 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस – गोरखपुर ही 29 सप्टेंबर पासून पुढील आदेश पर्यंत दर मंगळवारी प्रस्थान स्टेशन हुन सायंकाळी 5.50 वाजता प्रस्थान करून तिसऱ्या दिवशी पहाटे 4.30 वाजता गोरखपुर पोहचेल . ही गाडी बुधवार – भुसावळ – रात्री 12.45/12.50, खंडवा 02.50/02.55, हरदा ,इटारसी, हबीबगंज, विदिशा , झाँसी, ओरई, कानपूर सेंट्रल , लखनऊ , बाराबंकी , गोंडा , बलरामपुर , झारखंडी, तुलसीपुर, बरहनी , शोहरतगढ़, नौगढ़, आनंद नगर या ठिकाणी थांबेल .  

गाड़ी क्रमांक – 05063  अप  गोरखपुर -  लोकमान्य टीळक टर्मिनस ही 28 सप्टेंबर पासून पुढील आदेश पर्यंत दर सोमवार  ला प्रस्थान स्टेशन हुन पहाटे 5.30 वाजता प्रस्थान करून तिसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस पोहचेल .  
गाड़ी क्रमांक – 05066 डाउन पनवेल – गोरखपुर ही 30 सप्टेंबर पासून पुढील आदेश पर्यंत दर बुधवार  ला प्रस्थान स्टेशन हुन सायंकाळी 5.50 वाजता प्रस्थान करून तिसऱ्या दिवशी पहाटे 4.30 वाजता गोरखपुर पोहचेल. ही गाडी बुधवार – नासिक रोड – रात्री 9.15/9.20 , गुरुवार ला   – भुसावळ – 12.45/12.50, खंडवा 02.50/02.55, हरदा , इटारसी , हबीबगंज, विदिशा , झाँसी , ओरई, कानपूर सेंट्रल , लखनऊ , बाराबंकी , गोंडा , बलरामपुर , झारखंडी, तुलसीपुर, बरहनी , शोहरतगढ़, नौगढ़, आनंद नगर या ठिकाणी थांबेल.  

गाड़ी क्रमांक – 05063  अप  गोरखपुर -  लोकमान्य टिळक टर्मिनस ही २८ सप्टेंबरपासून दर सोमवार ला प्रस्थान स्टेशन हुन पहाटे 5.30 वाजता प्रस्थान करून तिसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस पोहचेल .  
गाड़ी क्रमांक – 05068 डाउन बांद्रा टर्मिनस   – गोरखपुर ही 2 सप्टेंबर पासून दर शुक्रवार ला रात्री 12.20 वाजता प्रस्थान करून दुसऱ्या  दिवशी दुपारी 5.55  वाजता गोरखपुर पोहचेल. शुक्रवारी जळगाव -11.20/11.25 ,  भुसावळ –11.50/11.55, खंडवा-14.37/14.40, हरदा , इटारसी , हबीबगंज, विदिशा , झाँसी , ओरई, कानपूर सेंट्रल , लखनऊ , बाराबंकी , गोंडा , बलरामपुर , झारखंडी, तुलसीपुर, बरहनी , शोहरतगढ़, नौगढ़, आनंद नगर या ठिकाणी थांबेल . गाड़ी क्रमांक – 05067 अप  गोरखपुर - बांद्रा टर्मिनस  ही 30 सप्टेंबर पासून दर बुधवार  ला पहाटे 5.30 वाजता प्रस्थान करून दुसऱ्या  दिवशी रात्री 7.10   वाजता बांद्रा टर्मिनस ला पोहचेल.  गुरुवारी-    खंडवा- 06.45/06.48, भुसावळ – 08.30/08.35, जळगाव -09.00/09.05 , नंदुरबार , उधना , वापी , बोरीवली या ठिकाणी थांबेल. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal Six special trains will run to avoid congestion of passengers