बनवाबनवी...कृषी केंद्राकडून युरियाची कृत्रिम टंचाई; भरारी पथकाकडून तपासणी

uriya
uriya

भुसावळ (जळगाव) : तालुक्यातील काही कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना चढ्या दराने खत विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर तालुका कृषी विभागाने परिसरातील खत विक्रेत्यांवर छापे टाकले. त्यामध्ये कृषी सेवा केंद्रातील व्यवहार, खतसाठा, विक्री रजिस्टर, बिलबुकाची प्रत्यक्ष पहाणी केली. रजिस्टर व बिलासंदर्भात कडक शब्दांत समज देण्यात देण्यात आली.

सध्या खरीप हंगामास सुरुवात झाली असून, युरियाची आवश्यकता भासत असल्याने शेतकरी खत दुकानात जाऊन युरियाबाबत विचारणा करीत आहेत. मात्र युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. युरिया हवा असेल तर इतर खतेही खरेदी करा तरच युरिया देतो अशा तक्रारी होत्या. साऊंड तालुक्यात 900 मेट्रिक टन रासायनिक खते उपलब्ध असून त्यापैकी चारशे मेट्रिक टन युरिया चा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेली बी- बियाणे आणि खते यांचा मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागामार्फत भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे, मंडळ कृषी अधिकारी डी. एस. पोळ, पंचायत समिती कृषी अधिकारी पी. एल. धांडे यांच्या पथकाने भुसावळ सह कुऱ्हा, वरणगाव, तळवेल परिसरातील कृषी केंद्राची तपासणी केली. बाजारभावापेक्षा अधिक दराने खत विक्री केली जात आहे. पिकाला खताची मात्रा देण्याशिवाय पर्याय नसलेले शेतकऱ्यांना वाढीव दराने युरिया खरेदी करण्याची वेळ आली आहे.  

हेपण वाचा - पीककर्जात राष्ट्रीयकृत बँका पिछाडीवर
 
युरियाचा अतिवापर हानिकारक
शेतकऱ्यांनी कपाशीसाठी पेरणी करताना 20 किलो युरिया, 50 किलो डीएपी, व 40 किलो पोटॅश अशा प्रमाणात खताची आवश्यकता असते. जास्त प्रमाणात युरिया खत दिल्यास पिकाची कायिक वाढ होते. मात्र रसशोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी आदी किडींचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी कीटकनाशकांवर खर्च वाढल्याने उत्पादन खर्चातही वाढ होते. म्हणून शेतकऱ्यांनी युरिया चा अति वापर न करता, इतर मिश्र व संयुक्त रासायनिक खतांचा माती परीक्षण अहवाला प्रमाणे वापर करणे अपेक्षित आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com