खडसेंचा फोटो अवघ्‍या पाच मिनिटात हटविला

eknath khadse
eknath khadse

बोदवड (जळगाव) : पंचायत समितीच्या बांधकाम विभागात असलेला एकनाथ खडसेंचा फोटो लावण्यात आलेला होता. परंतु हा फोटो काढण्यासंदर्भात युवासेनेतर्फे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिल्‍यानंतर अवघ्‍या पाच मिनिटात खडसेंचा फोटो काढण्यात आला.

बोदवड पंचायत समितीच्या बांधकाम विभागात एकनाथ खडसेंचा फोटो असल्‍याने तो हटविण्यासाठी युवासेनेतर्फे निवेदन देत आंदोलनाचा ईशारा दिला. यानंतर खडसेंचा फोटो अवघ्या पाच मिनिटांत हटविण्यात आला. ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार शासकिय कार्यालयात जिल्हा किंवा राज्यस्तरावरील राजकिय व्यक्तींचे फोटो लावण्यास प्रतिबंध घालण्यात आला असतांना बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयातील शाखा अभियंत्यांच्या दुर्लक्षामूळे बांधकाम विभागात राजकिय व्यक्ती म्हणून एकनाथ खडसेंचा फोटो होता. यामुळे ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकाचे ऊल्लंघन झाले असल्याने हा फोटो तात्काळ काढण्यात यावा अन्यथा येत्या दोन दिवसांत युवासेनेकडूनच फोटो काढण्यात येईल; असे निवेदन देताच अवघ्या पाच मिनिटांत फोटो हटवण्यात आला. 

महापुरूषांच्या खाली होता फोटो
पंचायत समितीच्या बांधकाम विभागात मतदार संघाचे माजी आमदार एकनाथ खडसे यांचा फोटो लावलेला होता. फोटोंच्यावर महापुरुषांचे फोटो असून त्यांच्या खाली डाव्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराज व ऊजव्या बाजूस माजी आमदार एकनाथ खडसे यांचा फोटो लावलेला आहे. बांधकाम विभागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो महापुरुषांच्या रांगेत लावून राजकिय व्यक्ती असलेला फोटो काढण्याची मागणी होती. निवेदन देतेप्रसंगी युवासेना ऊपजिल्हा प्रमूख पवन सोनवणे, शिवसेना तालूका संघटक शांताराम कोळी, शहरप्रमूख हर्षल बडगूजर, संजय महाजन, अल्पसंख्यांक ऊपजिल्हा संघटक कलिम शेख आदी शिवसैनिक होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com