चाळीसगावात उद्यापासून दोन दिवस पूर्णपणे बंद

चाळीसगावात उद्यापासून दोन दिवस पूर्णपणे बंद
chalisgaon lockdown
chalisgaon lockdownsakal

चाळीसगाव (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील लॉकडाउनचे (Jalgaon lockdown) निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले असले तरी तालुक्यात कोरोना रुग्णांची (Coronavirus) वाढती संख्या पाहता, शहरात शनिवार व रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यु (Janata curfew) सारखा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे केवळ मेडीकल दुकाने वगळता इतर सर्व दुकाने शनिवार व रविवार दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय व्यापार्यांसोबत प्रशासनाने आज घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार अमोल मोरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. (chalisgaon-again-two-days-full-lockdown-coronavirus)

chalisgaon lockdown
शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुखपदी भंगाळे, मानेंची नियुक्ती

राज्य शासनाने पाच टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया उद्यापासून सुरु केली आहे. शासनाच्या निर्णयाचा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल (Social media viral massage) झाल्यानंतर उद्यापासून सर्व दुकाने सुरु होतील, अशी चर्चा होती. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात जेवढी कोरोना रुग्णांची संख्या आहे, तेवढी मिळून संख्या एकट्या चाळीसगाव तालुक्यात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने शहरातील विविध व्यापार्यांसोबत तहसीलदार कार्यालयात बैठक घेऊन चर्चा केली. बैठकीला प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड उपस्थित होते.

गर्दी वाढू लागली होती

सकाळी सात ते दोन या वेळेत शहरात दररोज खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालिका व पोलीस प्रशासनातर्फे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा देखील उगारला जात आहे. मात्र, अजूनही पाहिजे त्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. एकूणच तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आज राज्य शासनाने अनलॉकचा निर्णय घेतला.

chalisgaon lockdown
पाच मिनिटात कोरोनाचा रिपोर्ट अन्‌ कार्यालयात प्रवेश

व्यापाऱ्यांचेही समर्थन

भविष्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शहरातील किराणा, कृषी, मेडीकल, हार्डवेअर, कापड दुकानदारांसह इतर विविध दुकानदारांशी चर्चा करण्यासाठी आज तहसील कार्यालयात छोटेखानी बैठक घेतली. बैठकीत शनिवार व रविवार असे दोन दिवस मेडीकल वगळता सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला विविध व्यापाऱ्यांनी समर्थन दिले.

शनिवारी कृषी केंद्र काही वेळ सुरू

सध्या पेरणीचे दिवस असल्याने केवळ कृषी केंद्र शनिवारी ७ ते १२ या वेळेपर्यंत सुरु राहणार आहेत. रविवारी मात्र कृषी केंद्र पूर्णपणे बंद राहतील. स्थानिक पातळीवर सर्वानुमते घेण्यात आलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अमोल मोरे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com