आजच विसरलो हो साहेब जावू द्या ना..तरीही पोलिसांची हाफ सेंच्युरी

coronavirus no mask use
coronavirus no mask use

चाळीसगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना वारंवार आवाहन करूनही नागरिक गांभीर्याने नियमांचे पालन करताना दिसत नाही त्यामुळे येथील पोलिसांनी आज विना मासचे करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला याप्रकरणी सुमारे ५२ जणांकडून प्रत्येकी शंभर याप्रमाणे पाच हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केला. 
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. तरीही नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाही. उच्च न्यायालयाने विनामास्क फिरण्याला सामाजिक अपराध म्हणून संबोधले आहे, असे असतानाही विना मास्क शहरात फिरणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. त्यामुळे नागरिकांना शिस्त लागावी व कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत व्हावी, यासाठी येथील पोलिसांनी आज कारवाईचा बडगा उगारला. 

नाकाबंदी करत कारवाई
शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, पोलिस शिपाई विनोद खैरनार, प्रकाश पाटील, महेंद्र पाटील, संदीप पाटील, तसेच होमगार्ड जाधव, पवार, पाटील यांचे पथकाने नगरपालिकेचे कर्मचारी अजय देशमुख, किशोर राजपूत व रफिक शेख यांच्या सहकार्याने शहरातील गर्दीचे ठिकाण असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात नाकाबंदी करून विनामास्क फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. 

कारणांचा सरबत्‍ती
सदरच्या कारवाईत ५२ नागरिकांकडून प्रत्येकी १००  रुपये याप्रमाणे ५ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी मास्क न लावल्याची बहुविध कारणे दाखवत पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात, आता घरातून बाहेर आलो, दवाखान्यात गेलो होतो, तब्बेत बरी नाही, अंत्यविधीला जात असल्याने विसरलो, पहिल्यांदाच मास्क घालायला विसरलो अशी कारणे दिली. परंतु, पोलिसांनी त्यांना मास्क लावणे किती गरजेचे आहे; हे पटवून दिले व त्यांचा नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून दंड वसूल केला. दरम्यान पोलिसांनी केलेल्या आजच्या कारवाईचे समाजातून कौतुक होत असून या कारवाईत सातत्य ठेवावे अशी मागणी होत आहे. 
 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. तेव्हा नागरिकांनी मास्क लावणे नितांत गरजेचे आहे. विनामास्क घराबाहेर पडू नये, अन्यथा पोलीस नियमानुसार कारवाई करतील.
- विजयकुमार ठाकूरवाड, पोलीस निरीक्षक, चाळीसगाव शहर 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com