शेतात गोंडस पाडसाने शेतकरी कुटुंबाला लावला लळा  

शेतात गोंडस पाडसाने शेतकरी कुटुंबाला लावला लळा  


चाळीसगाव ः जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुकामधील  ब्राह्मणशेवगे शिवारात काही दिवसांपासून हरणांचा मुक्त संचार सुरू आहे. यामुळे पिकांना धोका निर्माण झाला असला, तरी एका शेतात गोंडस पाडसाने शेतकरी कुटुंबाला मात्र चांगलाच लळा लावला आहे.

स्थानिक पर्यावरणप्रेमींनी ब्राह्मणशेवगे शिवारातील झाडांची कत्तल होऊ दिली नाही. त्यामुळे या भागात विविध पक्ष्यांसह वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. मागील वर्षी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून व या वर्षी मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा उपक्रमामुळे शिवारात चांगले पाणी उपलब्ध असल्याने वन्यप्राण्यांची सोय झाली आहे.

सद्यःस्थितीत शेतांमध्ये आढळून येणारे हरणांचे कळप पिकांचे नुकसान करीत असले, तरी अनेक शेतकरी भूतदया दाखवत या नुकसानीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्याचा प्रत्यय विठ्ठल देसले यांच्या शेतात दिसून आला. त्यांच्या घराजवळच्या शेतात निंदणी सुरू असताना, हरणाचे गोंडस पाडस गवत खात असताना चिमुरडीला दिसले. जवळपास अर्धा तास हे पाडस शेतात रमले. लहान मुलगी त्या पाडसाजवळ गेल्यानंतर ते पळाले नाही. उलट तिच्यासोबत ते खेळू लागले. चिमुरडीने पाडसाला कोवळे गवत खाऊ घातले. हा अविस्मरणीय क्षण शेतकऱ्याने मोबाईलमध्ये टिपला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com