आठ वर्षीय चिमुकलीवर अत्‍याचार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

मुलींवरील अत्‍याचाराच्या घटना एका मागून एक उघडकीस येत आहेत. राज्‍यात दररोज कुठे ना कुठे अत्‍याचाराच्या घटना वाढतच चालल्‍या आहेत.

मेहुणबारे (जळगाव) : आई- वडिल शेतात मजुरीसाठी गेले होते. यावेळी घरात एकटी असलेल्या आठ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून निर्जळस्थळी नेत नात्याने काका असलेल्या नराधमाने अमानुष अत्याचार केल्याची घटना बिलाखेड (ता. चाळीसगाव) येथे घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.
   
मुलींवरील अत्‍याचाराच्या घटना एका मागून एक उघडकीस येत आहेत. राज्‍यात दररोज कुठे ना कुठे अत्‍याचाराच्या घटना वाढतच चालल्‍या आहेत. हाथरस येथील घटना अद्याप ताजी असताना चाळीसगाव तालुक्‍यात आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्‍याचार झाल्‍याची घटना उघडकीस आली आहे.

आई- वडील होते शेतात
आठ वर्षीय पीडित बालिकेचे आई- वडिल शेत मजुर आहेत. बालिकेचे आई- वडिल दोघेही मजुरीच्या निमीत्ताने घराबाहेर पडले. दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान पीडित मुलगी घरी एकटी असतांना संशयित आरोपी गोरख भिमराव सोनवणे (वय २२, रा. बिलाखेड) याने बालिकेचे अपहरण करत बिलाखेड शिवारात ओसाड जागी झाडाझुडपात नेत तिच्यावर अत्याचार केला. घडलेला सर्व प्रकार सायंकाळी बालिकेने आई- वडिलांना सांगितला. याप्रकरणी पीडित बालिकेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गोरख सोनवणे याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस ताब्यात घेतल्याचे कळते. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे हे करीत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon eight year girl atyachar boy relation in uncal