सारे गाव निशब्द, फक्त कुटूंबाचा हदय पिळवणारा आक्रोश; शहीद जवानावर अंत्यसंस्कार

दिपक कच्छवा
Saturday, 28 November 2020

पहाटेपासूनच पिंपळगाव येथे गर्दी जमू लागली होती, दरम्यान पार्थिव गावात दाखल झाले अणि कुटुबासह गावकरी व उपस्थितांच्या अश्रुंचा बांध फुटला.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय घोषणांच्या अशा निनादात शहीद जवान यश देशमुख यांच्या पार्थिवावर आज सकाळी अकराला पिंपळगाव (ता. चाळीसगाव) या त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवानाला शेवटचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आवश्य वाचा- मागून हल्ला केला, पुढून केला असता तर माझ्या यशने किमान 3 जणांना तरी मारलं असतं
 

श्रीनगर भागातील एचएमटी भागात दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या लष्कराच्या शीघ्र कृती दलावर भ्याड बेछुट गोळीबार केला होता. या गोळीबारात शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळगाव  (ता. चाळीसगाव) येथील वीर जवान यश डिगंबर देशमुख (21) यांना वीर मरण आले होते. आज शनिवारी सकाळी सातला त्यांचे पार्थिव मूळगावी पिंपळगाव येथे आणण्यात आले. त्यानंतर गावातून फुलांनी सजलेल्या सैन्य दलाच्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. वंदे मातरम, शहीद जवान यश देशमुख अमर रहे ! पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. साश्रू नयनांनी वीर जवानावर शासकीय इतमामात गावापासून जवळच असेलल्या घोडेगाव रस्त्यावरील मोकळ्या जागेवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान यश देशमुखचा लहान भाऊ पंकज देशमुख याने भावाच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, सैन्य दलातील अधिकारी उपस्थित होते. अग्निडाग देण्यापूर्वी शहीद जवान यश देशमुख यांना सैन्य दल व पोलिसांतर्फे हवेत बंदुकीच्या फैऱ्या झाडून मानवंदन देण्यात आली. 

Image may contain: one or more people, people walking, crowd and outdoor

साडे तीनशे फुटाचा तिरंगा
शहीद जवान यांची अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्ययात्रेस सुरुवात झाली. अंत्ययात्रेच्या पुढे दुतर्फा तब्बल साडे तीनशे फुट लंाबीचा तिरंगा धरलेले तरूण अआणि त्यामागे अंत्ययात्रा असे भारावणारे दृश्य पाहतांना उपस्थितांना अक्षरशा गहिवरून आले.

मान्यवरांकडून श्रद्धांजली 
पिंपळगाव येथे काही काळ त्यांचे पार्थिव अंतीम दर्शनासाठी ठेवण्यात आले. या ठिकाणी त्यांचे कुटुंबिय आणि नातेवाईक यांनी दर्शन घेतले.त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॅ्नटरवरून अंत्ययात्रेला सुरूवात झाली.अमर रहे, अमर रहे यश देशमुख अमर रहे, जब तक सुरज चांद रहेंगा... तब तक यश तेरा नाम रहेगा, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत ही अंत्ययात्री घोडेगाव रस्त्यावरील मोकळया पटांगणावर आली.तेथे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री दादा भुसे,  खा. उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे,उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी पुष्पचक्र वाहुन आदरांजली वाहण्यात आली.  

वाचा- उभारी’ उपक्रमात मंगळ ग्रह सेवा संस्थेचे भरीव योगदान 
 

No photo description available.

 

हृदय पिळवटून टाकणारा कुटूंबाचा आक्रोश
पहाटेपासूनच पिंपळगाव येथे गर्दी जमू लागली होती, दरम्यान पार्थिव गावात दाखल झाले अणि कुटुबासह गावकरी व उपस्थितांच्या अश्रुंचा बांध फुटला. यश यांच्या घरी पार्थिव आणल्यानंतर यश यांची आई सुरेखाबाई, वडिल डिगंबर देशमुख, दोन्ही बहिणी व भाऊ पंकज यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.यावेळी गावात व परिसरातील महिलांच्या डोळ्यांत अश्रू वाहत होते.

Image may contain: 2 people

 

अखेरचा निरोप
पोलीस आणि लष्करी जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदूकीच्या तीन फैरी झाडून आणि अंतीम बिगूल वाजवून मानवंदना दिली. शिपाई अमोल, हवालदार अखतवार, नायब सुभेदार कदम, सुभेदार रामनिवास, लेफ्टनंट कर्नल प्रशांत देशमुख  कर्नल सारंग मनोहर उपस्थित होते. 

 

No photo description available.

राज्य शासनातर्फे 1 कोटी 
शहीद जवानाच्या कुटुंबीयांना सर्व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर राज्य शासनातर्फे एक कोटीची मदत दिली जाईल, अशी ग्वाही कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली. या भ्याड हल्ल्याचा निषेध करुन शहीद जवानाचे बलीदान व्यर्थ जाणार नाही असे सांगून पाकिस्तानला धडा शिकवला जाईल असेही त्यांनी सांगितले. शहीद जवानाच्या कुटुंबीयांना शासनाच्या योजनांचा योग्य तो लाभ मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांनी शहीद जवानाच्या स्मारकासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. गावाच्या वतीने सरपंच संतोष देशमुख यांनी श्रद्धांजली अर्पण करुन विकासाची कामे कमी करा पण पाकिस्तानला धडा शिकवा अशी भावना व्यक्त केली.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon martyr yash deshmukh was cremated in a state funera