esakal | पोहायला गेलेल्या तरुणाचा धरणाच्या सांडव्यात पडून मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

पोहायला गेलेल्या तरुणाचा धरणाच्या सांडव्यात पडून मृत्यू 

शनिवारी सायगाव येथिल सागर सुदाम पाटील (वय 26)  हा पोहायला गेला असता तो मन्याड धरणाच्या सांडव्यात पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला.

पोहायला गेलेल्या तरुणाचा धरणाच्या सांडव्यात पडून मृत्यू 

sakal_logo
By
दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव):- चाळीसगाव तालुक्यात आज विविध ठिकाणी दोघांचा पाण्यात पडुन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या.यामध्ये पातोंडा (ता.चाळीसगाव)येथे शेतमजुराचा फरशी पुलावरून पाय घसरुन वाहुन गेला तर दुसरी घटना सायगाव (ता.चाळीसगाव)येथील पोहायला गेलेल्या तरुणाचा आज सायंकाळी चार वाजता मन्याड धरणाच्या पाण्यात बडुन  मृत्यू झाला.या घटनांमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

शेतातून घराकडे जाणाऱ्या शेतमजुर फरशी पुलावर पाय घसरून पाण्यात पडून वाहून गेल्याची घटना पातोंडा येथ आज सकाळी साडेनऊच्या  सुमारास घडली.पातोंडा येथील कैलास बाबुलाल पाटील (48) हा आज शनिवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास शेतातून घराकडे येत असतांना पातोंडा गावाजवळील फरशी पुलावरून जातांना त्याचा पाय घसरला. त्यामुळे तो पाण्यात पडून वाहून गेला. ही माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटना स्थळी धाव घेतली असता फरशी पुलापासून 200 फूट अंतरावर कैलास पाटील याचा मृतदेह आढळून आला.मृत कैलास पाटील याच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेने पातोंडा गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार धर्मराज पाटील हे करीत आहेत.

सायगावचा तरुणाचा मृत्यू 

सायगाव( ता.चाळीसगाव) येथे आज शनिवारी (ता.२६) रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास पोहायला गेलेल्या तरुणाचा मन्याड धरणाच्या सांडव्यात खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.यामुळे सायगाव गावावर शोककळा पसरली आहे.

सायगाव ता.चाळीसगाव येथील तरुण मन्याड धरण येथे फिरायला गेला होता.या धरणावर पोहायला अनेक लोक ये- जा करतात. शनिवारी सायगाव येथिल सागर सुदाम पाटील (वय 26)  हा पोहायला गेला असता तो मन्याड धरणाच्या सांडव्यात पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला. यात तो मयत झाला असून याबाबत पोलीस चौकशी करीत आहे. सागर हा एकुलता एक मुलगा असल्याने खुप लाडाचा होता आणि त्याचा विहीर खोदकाम करण्याचा व्यवसाय होता.दुर्देवाची बाब म्हणजे लाँकडाऊन मध्ये त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, 1 मुलगा, 3 बहिणी आहे.

संपादन-भूषण श्रीखंडे     

loading image
go to top