कोरोनाचा कहर सुरूच... चाळीसगाव तालुका पन्नाशी पार

कोरोनाचा कहर सुरूच... चाळीसगाव तालुका पन्नाशी पार

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. काल रात्री उशिरा एक आणि आज आणखी तीन असे चाळीसगाव शहर व तालुक्यात चार कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. शहरात कोरोनाने आज विश्रांती घेतली पण तालुक्यातील जावळे व वडाळे वडाळी येथे दोन रूग्ण आढळून आले. तर गुड शेफर्ड शाळेच्या मागे वास्तव्यास असलेल्या 80 वर्षीय वृध्दाचा काल जळगावी मृत्यु झाला. दरम्यान शहरासह जावळे व वडाळी येथील चौघांच्या संपर्कातील एकूण30 जणांना क्वारंटाईन केले. उद्या त्यांचे स्वॅब घेतले जाणार आहेत.

चाळीसगाव तालुक्यात हा हा म्हणता कोरोनाने पन्नाशी ओलांडली आहे.आज आणखी चार रूग्ण आढळून आले. त्यात जावळे येथील 55 वर्षीय महिलेला कोरोना सदृश्य लक्षणे जाणवू लागल्याने जळगाव येथे उपचारार्थ दाखल केले होते. या महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला. महिलेच्या संपर्कातील 12 जणांना क्वारंटाइन करून कन्टेन्मेंट झोन करण्यात आला आहे. तर वडाळे वडाळी येथेही काल उशिरा 60 वर्षीय वृद्ध कोरोना बाधित आढळून आला. या वृद्धाच्या संपर्कातील 10 जणांना क्वारंटाईन केले असून वृद्ध राहत असलेला परिसर कन्टेन्मेंट झोन करण्यात आला आहे. सर्वांचे उद्या स्वॅब घेण्यात येणार आहेत. 

शहरात कोरोनाचा फैलाव
चाळीसगाव शहरात आता कोरोनाचा अधिक फैलाव होत आहे.गुड शेफर्ड शाळेच्या पाठीमागे राहणाऱ्या 80 वर्षीय वृद्धाचा काल जळगावी मृत्यु झाला. त्याच्या संपर्कात आलेल्या पत्नी व मुलाला देखील कोरोनाची लागण झालेली आहे.कोरोनाने काल पन्नाशी पार केली असून रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे एकच खळबळ उडाली आहे.शहरात कोरोनाबाबत जनजागृती होत नसल्याने रूग्णांची संख्या वाढत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com