
महामंडळाची बंदची सक्ती नसली तरी जनभावनेमुळे बंदचा निर्णय कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर घेतला गेला होता.
चोपडा :कोरोना संसर्मुग वाढत असल्याने चोपडा शहरातील बाजारपेठ बुधवार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतू आता चोपडा शहरातील बुधवार बंद आता ऎच्छीक राहणार आहे असा निर्णय चोपडा तालुका व्यापारी महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
आवश्य वाचा- पतंगाचा इतिहास मजेशीर; उडविणे आरोग्यदायी, पण चिनी मांजा टाळा चोपडा तालुका व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव बैठकीत म्हणाले की, व्यापारी महामंडळाने एकमताने चोपडा बुधवारी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.सर्वानुमते दंडाची रकम ठरली असली तरी कोणा कडूनही दंड वसूल केलेला नाही. महामंडळाची बंदची सक्ती नसली तरी जनभावनेमुळे बंदचा निर्णय कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर घेतला गेला होता.यापुढे चोपडा शहरातील बुधवार बंद आता ऎच्छीक राहणार आहे यात प्रशासन हस्तक्षेप करणार नाही
.
बहुतांश व्यापारी बुधवार बंदच्या समर्थनात
व्यापारी महामंडळाच्या या बैठकित व्यापाऱ्यांमध्ये एकमत झाले नाही.परंतु हात उंच करुन घेतलेल्या चाचणीत बहुतांशी व्यापारी बुधवार बंदच्या समर्थनात दिसून आले.
आवश्य वाचा- रुग्णसेवेसाठी जळगावात धावणार ‘लाइफलाइन’
आता बंद ऎच्छिक - सचदेव
कोव्हीड 19 व व्यापारी बांधवांची मागणी पाहता यापुढे बुधवार हा साप्ताहिक बंदचा निर्णय ऎच्छीक राहणार असल्याची घोषणा बैठकीचे शेवटी व्यापारी महामंडळ अध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी केली आहे.तथापि स्वेच्छेने बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
संपादन- भूषण श्रीखंडे