esakal | चोपडा सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची लुट; कट्टी बंद करा, अन्यथा आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

चोपडा सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची लुट; कट्टी बंद करा, अन्यथा आंदोलन 

चोपड्यात सीसीआय केंद्रात शेतकऱ्यांचा कापूस मोजला जात असून प्रती क्विंटल कापसाला चार ते पाच किलो कट्टी लावली जात असल्याच्या तक्रारी येत आहे. 

चोपडा सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची लुट; कट्टी बंद करा, अन्यथा आंदोलन 

sakal_logo
By
सुनील पाटील

चोपडा  : येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र, शेतकऱ्यांचे कैवारी असणारे शेतकऱ्यांची लूट होते तेव्हा दुर्लक्ष करतात. नैसर्गिक आपत्तीने शेतकरी आर्थिक कर्जबाजारी झाला आहे. त्याच्या मालाची लूट करू नका, अशी आर्त हाक तालुक्यातील शेतकरी संघटनेने शासनापुढे केली आहे. जर कट्टी बंद केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

वाचा- जळगावकर सावधान ः शहरात कोरोनाचे नविन 28 रुग्ण -

यावर्षी दोन ते तीन दिवसांपासून चोपड्यात कापूस खरेदीसाठी सीसीआय केंद्र सुरू झाले असून, त्यात शेतकऱ्यांचा कापूस मोजला जात आहे. मात्र, प्रती क्विंटल कापसाला चार ते पाच किलो कट्टी लावली जात असल्याचे अनधिकृत असून, खाली वाहनांचा काटा वजनमाप करते वेळीस काट्यावर माणस उभी करुण कट्टी कापले जाते, ही लूट त्वरित थांबवावी, अन्यथा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल. होणाऱ्या नुकसानीस संबंधित प्रशासन जबाबदार असेल, अशा आशयाचे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. २०) नायब तहसीलदार राजेश पउळ यांना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, उपजिल्हाध्यक्ष किरण पाटील तालुकाध्यक्ष नितीन निकम यांनी दिले. 

मोजणीवेळी वांधा कमिटी लक्ष ठेवणार; बैठकीत निर्णय 
चोपड्यात सीसीआय केंद्रात शेतकऱ्यांचा कापूस मोजला जात असून प्रती क्विंटल कापसाला चार ते पाच किलो कट्टी लावली जात असल्याच्या तक्रारीवरून शनिवारी (ता. २१) सायंकाळी पाचला गो. भि. जिनिंगमध्ये झालेल्या बैठकीत आठ ते बारा मॉइश्चरपर्यंत असलेला कापूस मोजला जाईल, परंतु १३ च्या पुढे मॉइश्चर असलेला कापूसबाबतचा निर्णय वांधा कमिटी घेईल. याबाबत यापुढे वांधा कमिटी लक्ष ठेवणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस विधानसभा माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराती, चोसाका माजी अध्यक्ष ॲड. घनश्याम पाटील, ग्रेडर यादव, जिनर ऋषी गुजराथी, बाजार समिती सभापती कांतिलाल पाटील, उपसभापती नंदकिशोर पाटील, शेतकरी संघटना प्रतिनिधी नितीन निकम, सचिन शिंपी, संदीप पाटील, विनोद धनगर, बाजार समिती संचालक हनुमंत महाजन, नितीन पाटील, शेतकी संघ अध्यक्ष एल. एन. पाटील, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यावर अन्याय होत असेल त्याने त्या वेळेसच बाजार समिती अथवा शेतकरी संघटनेकडे तक्रार करावी. माल मोजल्यानंतर तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही. कमिटीचे अध्यक्ष बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर पाटील हे काम पाहणार आहेत. एफएक्यूनुसार मालाची खरेदी करावी. मात्र असे केल्यास काही शेतकऱ्यांचा माल यामुळे खरेदी होणार नाही. यामुळे यातून मार्ग काढून वांधा कमिटीचा निर्णय योग्य तो ग्राह्य धरला जाणार आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे